Indian Navy Recruitment 2024 | सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध पदांच्या भरती निघत आहे. त्यामुळे ही आता तरुण आणि तरुणींसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये सरकारने यावर्षी बँकेच्या, आर्मी राज्य सरकारच्या जिल्हा परिषद अंतर्गत तसेच इतर अनेक विविध भरती प्रक्रिया राबवल्या आहेत. त्याचे नोटिफिकेशन देखील अधिकृत वेबसाईटवर जारी केलेले आहे. अशातच सरकारकडून इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलाकडून देखील रिक्त पदे निघालेली आहेत.
ज्या तरुणांना इंडियन नेव्हीमध्ये काम करायचे आहे. त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण यावर्षी इंडियन नेव्हीमध्ये तब्बल 254 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी सरकारने अधिसूचना देखील जारी केलेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
रिक्त पदांचा तपशील | Indian Navy Recruitment 2024
अधिसूचनेनुसार इंडियन नेव्हीमध्ये (Indian Navy Recruitment 2024)तब्बल 254 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही भरती प्रामुख्याने शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर या पदासाठी घेतली जाणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
- एक्झिक्यूटिव्ह ब्रांच –
- एसएससी जनरल सर्विस यामध्ये एकूण 50 रिक्त जागांची भरती होणार आहे.
- एसएससी पायलेटमध्ये 20 रिक्त जागांची भरती होणार आहे.
- सिव्हिलियर ऑपरेशन सर्व ऑफिसर एकूण 18 रिक्त पदांची जागा भरती होणार आहे.
- त्याचप्रमाणे एसएससी ट्राफिक कंट्रोल इथे 8 पदांची भरती होणार आहे.
- तसेच एसएससी लॉजिस्टिक 29 पदांची भरती होणार आहे.
- त्याचप्रमाणे एसएससी नेवल आर्मीट इन्स्पेक्शन येथे 10 पदांची भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
एक्झिक्यूटिव्ह ब्रांच –
बीई, बीटेक आणि बीएससी, बीकॉम आयटीपी डिप्लोमा फायनान्स लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंट मेटरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम सेमी एमसीए उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
एज्युकेशन ब्रँच –
प्रथम श्रेणी एमएससी मॅथ्स किंवा ऑपरेशनल रिसर्च फिजिक्स फ्लाईट फिजिक्स केमिस्ट्री किंवा 55 गुणासह इतिहास. (Indian Navy Recruitment 2024)
टेक्निकल ब्रांच-
60 गुणांसह बी किंवा बी टेक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
आवश्यक वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 दरम्यान असणे खूप गरजेचे आहे
परीक्षा शुल्क
या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क ठेवले गेलेले नाही
नोकरीचे ठिकाण
या भरतीमध्ये जर उमेदवाराची निवड झाली, तर त्यांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती करण्यात येईल
दरमहा वेतन
उमेदवाराची निवड झाल्यानंतर तर महिन्याला 56 हजार 100 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
या भरतीच्या अर्ज प्रक्रियेला 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झालेली आहे तर 10 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.