Indian Navy मध्ये 372 जागांसाठी भरती, 35 हजार पगार; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवाराना सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात 372 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चार्जमन या पदासाठी ही भरती होणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 मे 2023 पासून यासाठी अर्जप्रक्रिया सुरु होणार असून 29 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी लागणारे शिक्षण, पात्रता, पगार यासंबधीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

संस्था – भारतीय नौदल
पद संख्या – 372 पदे
भरले जाणारे पद – चार्जमन II
पगार किती – रु. 35,400/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.

भरतीचा तपशील –
1. इलेक्ट्रिकल ग्रुप – 42 पदे
2. वेपन ग्रुप – 59 पदे
3. इंजिनिअरिंग ग्रुप – 141 पदे
4. कंस्ट्रक्शन & मेंटेनेंस ग्रुप – 118 पदे
5. प्रोडक्शन प्लानिंग & कंट्रोल ग्रुप – 12 पदे

शैक्षणिक पात्रता –

सदर उमेदवाराने अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा विज्ञानातील भौतिकशास्त्र /रसायनशास्त्र / गणित या विषयांपैकी कोणत्याही एका विषयात बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –
1. किमान वय – 18 वर्षे
2. कमाल वय – 25 वर्षे असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 278/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. संगणक आधारित चाचणी
3. व्यापार चाचणी / कौशल्य चाचणी
4. मुलाखत

अशी होईल परीक्षा –
सर्व निवडलेल्या/पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या कॉम्प्युटरवर  आधारित परीक्षा द्यावी लागेल.

गुण विभाजन –
1. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 10 गुण
2. परिमाणात्मक योग्यता – 10 गुण
3. सामान्य इंग्रजी – 10 गुण
4. सामान्य जागरूकता – 20 गुण
5. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम – 50 गुण

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY