तरुणांना नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी; 224 जागांवर भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेक तरुणांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. मात्र अनेक कारणांमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. परंतु आता भारतीय नौदलाने (Indian Navy) अशा तरुणांना संधी देण्यासाठी नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर” पदासाठी 224 रिक्त जागा भरत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. कमिशन ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2023 आहे. अर्जविषयी सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

पदाचे नाव – नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर

रिक्त पदे – 224

कोणत्या पदांसाठी भरती?

एक्सिक्युटीव्ह ब्रँच –

SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडरमध्ये 40 पदे भरली जातील. एअर ट्रॅफिक कंट्रोलरमध्ये 8 पदे , नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर 18 पदे, पायलट विभागात 20 पदे, लॉजिस्टिक्स 20 पदे भरली जाणार आहेत.

एज्युकेशन ब्रँचमध्ये 18 पदे भरण्यात येणार आहेत.

टेक्निकल ब्रँच –

या ब्रँचमध्ये इंजिनिरिंग ब्रांचसाठी 30 पदे, इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी 50 पदे, नेव्हल कन्स्ट्रक्टरसाठी 20 पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

एक्सिक्युटीव्ह ब्रँचसाठी –

60+ टक्के गुणांसहीत इंजिनीअरिंग पदवी/ MBA/ B.Sc/ B.Com + फायनान्स/ लॉजिस्टिक/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट विषयात डिप्लोमा/ MCA/ M.Sc (IT) कम्प्लीट असणे आवश्यक.

एज्युकेशन ब्रँचसाठी –

60+ टक्के गुणांसहीत संबंधित विषयात M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech केलेले असावे.

टेक्निकल ब्रँच –

60+ टक्के गुणांसहीत संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक.

अर्ज भरण्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2023 ते 29 ऑक्टोबर 2023

अर्ज फी शुल्क – अर्ज करण्यासाठी फी आकारण्यात आलेली नाही.

अर्ज करण्याची लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/

सविस्तर माहिती https://www.indiannavy.nic.in/ अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.