Bank FD : ‘या’ बँकेने FD वरील व्याजदर बदलले, ग्राहकांना आजपासून मिळणार बंपर व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI ने 6 एप्रिल रोजी पतधोरण बैठकीचे निकाल जाहीर केले. ज्यामध्ये रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, असे असूनही अनेक बँकांकडून आपले डिपॉझिट्स वाढवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट्सचे दर वाढवत आहेत. याचदरम्यान, आता सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने देखील आपल्या FD वरील व्याजदरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे.

What went wrong at Indian Overseas Bank | Mint

बँकेकडून एकीकडे काही कालावधीसाठीचे व्याजदर 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे, काही निवडक कालावधीसाठीच्या व्याजदरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली ​​आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहिती नुसार, बँकेकडून 2 कोटींपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. 10 एप्रिल 2023 पासून बँकेचे हे नवीन FD व्याजदर लागू होतील. Bank FD

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD  Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

या कालावधीसाठी मिळेल 7.25% व्याज

या दरवाढीनंतर, बँकेकडून 444 दिवसांच्या FD वर 7% ऐवजी 7.25% व्याज दिला जाईल. तसेच बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के तर अति ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त रक्कम दिली जाईल. Bank FD

वर्षभराची FD करून मिळवा चांगला रिटर्न, या बँका एका वर्षासाठी देतायंत  सर्वाधिक व्याजदर – News18 लोकमत

एफडीचे नवीन दर

हे लक्षात घ्या कि, बँकेकडून ग्राहकांना 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 4%, 15 ते 29 दिवसांच्या FD वर 4%, 30 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 4.25% आणि 46 ते 60 दिवसांच्या FD वर 4.25% व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, बँक 61 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.25 टक्के, 91 दिवस ते 120 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के आणि 121 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज दर मिळेल. तसेच आता बँक 180 दिवसांपासून ते 269 दिवसांपर्यंतच्या FD वर 4.95 टक्के, 270 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.35 टक्के आणि 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50 टक्के व्याज देईल. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/Domestic_Rates

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Amazon वर बंपर सेल! 20 हजार रुपयांचा TV मिळतोय केवळ Rs 9,499 ला; पहा Offer लिस्ट