हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक हे विविध कारणांसाठी व्यवसायांसाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी लोन घेत असतात. लोन घेण्याचे प्रकार वेगवेगळे असतात .परंतु आजकाल गोल्ड लोन (Gold Loan) घेण्याचा प्रकार भारतामध्ये जास्त वाढत चाललेला आहे.. कर्ज घेण्याचा घेणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. त्यात लोक खास करून गोल्ड लोन घेत आहेत. म्हणजेच घरात जे सोने असते, ते सोने ते बँकेत ठेवून त्याच्या बदल्यात बँकांकडून पैसे घेतात. सध्या अशा प्रकारे लोन घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
आणि जाणकार व्यक्तींनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे की, येत्या पाच वर्षात गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दुप्पट होणार आहे. यावरून असे दिसत आहे की, भारतीय लोक हे जास्तीत जास्त कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत. भारतीयांनी जरी कर्ज घेतले, तरी याचा फायदा मात्र कर्ज देणाऱ्या कंपन्यांना होत आहे. परंतु हे कर्ज घेण्याचे प्रमाण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही, असे देखील अनेक लोकांचे म्हणणे आहे. सध्या जर आपण भारतात पाहिले, तर वाढती बेरोजगारी तसेच आर्थिक स्थैर्य नसणे यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे.
गेल्या काही दिवसांची आपण जर आकडेवारी पाहिली तर भारतीयांनी 200 टन सोने तारण ठेवून मार्केटमधून जवळपास 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. भारताने जे एकूण कर्ज घेतलेले आहे, त्यातील 20% कर्ज हे गोल्ड लोन द्वारे घेतले गेलेले आहे. सध्या भारतीयांकडे 18000 टन एवढे सोने आहे. ज्याची किंमत 50.40 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षामध्ये कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढलेली आहे आणि आता कर्ज घेणाऱ्या लोकांचे प्रमाण हे 50 टक्के झालेले आहे. जास्तीत जास्त लोक हे सोनेतारण ठेवूनच कर्ज घेतात.
आजपर्यंत सोन्याचा वापर केवळ दागिने बनवण्यासाठी केला जात होता. परंतु भारतीय लोक सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून देखील पाहतात. जेणेकरून वेळेला हेच सोने आपल्याला पैसे मिळवून देईल, या दृष्टीने अनेक लोक सोने करतात. रिझर्व बँकेने 20000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे कर्ज रोखीने देण्यावर बंदी घातलेली आहे.त्यामुळे ग्राहकांनाही रक्कम केवळ चलनाद्वारे मिळू शकते. परंतु यावर क्रिसल रेटिंग यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, गोल्ड लोन देण्याची तर डिजिटल पद्धत आली, तर त्याचा परिणाम नवीन कर्जावर होणार आहे.