Indian Railway : भारतामध्ये सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय दोन ठिकाणांमधली कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर तिथल्या अर्थकारणाला गती मिळते. म्हणूनच मोदी सरकार मागच्या अनेक दिवसांपासून दळणवळणाच्या सुविधा भक्कम करण्यावर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणूनच काल दिनांक 28 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये भारताच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे वाहतुकीला देखील प्राधान्य दिल्याचे दिसून येते. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रेल्वेसाठी नेमक्या कोणत्या घोषणा झाल्या ? याची माहिती (Indian Railway) आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत…
खरं तर केंद्रातील मोदी सरकारने देशातल्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम अंतर्गत 12 स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय त्यासाठी 28 हजार 602 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यासोबतच रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्याचा संदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मालवाहतुकीला गती मिळत देशातील व्यापार वाढून अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होणार (Indian Railway) आहे.
देशात 14 नवीन रेल्वे स्थानके उभारणार (Indian Railway)
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी आम्ही सांगितलं की आज देशभरात 14 नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन रेल्वे स्टेशन मुळे देशातील तब्बल 1300 गावं रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने 6456 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. अशी माहितीही (Indian Railway) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
पुढे बोलताना गोयल म्हणाले की, ” रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणे आणि नवीन रेल्वे मार्ग बांधणं यामुळे मालवाहतुकीला गती मिळेल देशातील पुरवठा साखळी मजबूत होईल त्यामुळे देशाचा व्यापार वाढून अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय नवीन रेल्वे लाईन टाकल्यामुळे जे भाग अजूनही रेल्वेशी जोडले गेलेले नाहीत त्यांना थेट देशभरातील रेल्वे मार्गशी जोडले जाणार आहे. त्यामुळे देशातील वाहतूक साखळीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांवर पायाभूत सुविधांचा विकास होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Railway) हातभार लागेल असे ते म्हणाले.
मालवाहतुकीसाठी मोठा फायदा होणार (Indian Railway)
रेल्वे नेटवर्क वाढवत असताना प्रामुख्याने ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. या प्रकल्प अंतर्गत 14 नवीन स्थानक बांधण्यात येणार आहेत. त्या राज्यातील अनेक क्षेत्रांना रेल्वेशीष जोडले जाणार आहे. यामुळे नवीन मार्गामुळे तेराशे गावं सुमारे 19 लाख लोकांना रेल्वेशी जोडण्याची संधी मिळणार आहे असं ते म्हणाले. शिवाय रेल्वे मार्गामुळे देशातील कृषी उत्पादने खते कोळसा लोखंड पोलाद सिमेंट चुनखडी इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे अशी माहिती अश्विनी (Indian Railway) वैष्णव यांनी दिली.