आता ‘या’ ट्रेनने स्वस्तात गोवा फिरा बिनधास्त; नागपूर-मडगाव स्पेशल एक्सप्रेस जुलैपर्यंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण मनसोक्त फिरण्यासाठी एखाद्या शांत आणि पर्यटनाच्या ठिकाणी जातात. तुम्हालाही जर फिरण्याचा आनंद लुटायचा असेल आणि तोही रेल्वेने तर रेल्वे प्रशासनाने तुमच्यासाठी विशेष पॅकेज आणले आहे. पाहूया काय आहे ते पॅकेज…

दिवसेंदिवस पर्यटन करणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्या जुलै महिन्यापर्यंत चालविण्यात येणार आहेत.

होळीत आणि उन्हाळ्याच्या सुट्या घालविण्यासाठी अनेकजण कुटुंबासह गोव्याला जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहे आरक्षण

गोव्याच्या पर्यटन वाढीसाठी आणि प्रवाशांकडून रेल्वेला अधिक पसंती मिळू देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास आरक्षणही ठेवले आहे. रेल्वेगाडी क्रमांक 01139 नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 1 जुलै 2023 पर्यंत आणि 26 फेब्रुवारीपर्यंत धावणारी रेल्वेगाडी क्रमांक 01140 मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 2 जुलैपर्यंत चालविण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या वेळेत, थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही रेल्वेगाड्यांचे आरक्षण 22 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच

मध्य रेल्वेच्या पूणे विभागात सातारा आणि कोरेगाव सेक्शनमध्ये डबलिंगसाठी 28 फेब्रुवारीला नॉन- इंटरलॉकिंगचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यालाच संपणार आणि तेथूनच धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 28 फेब्रुवारीला कोल्हपूरऐवजी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.