Indian Railway | कन्फर्म तिकीट आणि गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway | आजकाल रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सुखकर आणि आरामदायी मानला जातो. त्याचवेळी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये देखील रेल्वे प्रवाशांची संख्या आजकाल वाढतच चाललेली आहे. रेल्वे (Indian Railway) प्रवास करताना जेव्हा रेल्वेचे तिकीट कन्फर्म करावे लागते. त्यावेळी ट्रेनमधील गर्दी ही एक मोठी समस्या असते. परंतु आता रेल्वेने पुणे आणि मुंबईकरांना एक चांगली न्यूज दिलेली आहे.

ती म्हणजे आता मुंबई आणि पुण्यावरून (Indian Railway) मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रवासांना प्रवाह कन्फर्म तिकीट मिळू शकते आणि त्यांना ट्रेनमधील गर्दीचा सामना देखील करावा लागणार नाही. रेल्वेने सप्टेंबरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रवाशांची खूप जास्त गर्दी होते. आणि ती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबईत रीवा- पुणे ते जबलपूर दरम्यान असणाऱ्या गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे.

02188 सीएसएमटी मुंबई रीवा स्पेशल 28 जूनपर्यंत दर शुक्रवारी धावत होती. ती आता 27 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. या ट्रेनच्या जवळपास 13 ट्रीप वाढवण्यात आलेल्या आहेत. तसेच 02187 रेवा सीएसएमटी मुंबई स्पेशल 27 जूनपर्यंत दर गुरुवारी धावत होती. 26 सप्टेंबरपर्यंत या ट्रेनच्या 13 फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत.. त्याचप्रमाणे 02131 पुणे जबलपूर स्पेशल 1 जुलैपर्यंत सोमवारी धावते. तिचा कालावधी आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवणार आहे. या ट्रेनच्या एकूण 13 ट्रिप होणार आहेत.