Indian Railway: तुम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेकडून ‘या’ 5 सुविधा मिळतात मोफत

indian railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway: भारतात रेल्वे म्हणजे सर्वाधिक परवडणारे आणि आरामदायी प्रवास देणारे असे सार्वजनिक वाहन. म्हणूनच बहुसंख्य लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. एवढेच नाही तर भारतीय रेल्वे (Indian Railway) जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतीय रेल्वे प्रवाशांना विविध सोयी देखील पुरवत असते. प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने आणि आरामदायी होण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. एवढेच नाही तर भारतीय रेल्वेकडून वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेच्या काही सुविधा प्रवाशांसाठी मोफत आहेत. पण या सुविधांबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आज आपण रेल्वेमध्ये मिळणाऱ्या पाच मोफत सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत.

बेडरोल सेवा (Indian Railway)

भारतीय रेल्वेमध्ये एसी कोच मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत बेडरोल सेवा दिली जाते. एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड मधील प्रवाशांना ब्लॅंकेट, उशी, चादर आणि टॉवेल मोफत दिला जातो. गरीब रथ एक्सप्रेस मध्ये ही सुविधा 25 रुपये फी देऊन उपलब्ध करून दिली जाते आहे. काही ट्रेनमध्ये स्लीपर क्लासच्या प्रवाशांना देखील सुविधा मोफत दिली जाते.
वैद्यकीय सेवा

भारतीय रेल्वे कडून प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. ट्रेनमध्ये अचानक आजारी पडल्यास प्रवासांना मोफत वैद्यकीय सेवा मिळू शकते. यासाठी प्रवासी रेल्वे अधीक्षक, तिकीट कलेक्टर किंवा कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधू शकता.

मोफत जेवण (Indian Railway)

जर तुम्ही राजधानी शताब्दी किंवा दुरांतू सारख्या प्रीमियम ट्रेनमधून (Indian Railway) प्रवास करत असाल तर दोन तास उशिरा ट्रेन येत असेल तर रेल्वे प्रवाशांना मोफत जेवण देते.

लॉकर रूमची सुविधा

भारतीय रेल्वेच्या काही स्थानकांवर प्रवाशांना क्लॉक रूम आणि लॉकर रूमची सुविधा देखील मिळते. प्रवासी त्यामध्ये त्यांचा सामान ठेवू शकतात या सुविधेसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क भरावा लागतो.

वेटिंग हॉल (Indian Railway)

जर एखाद्या प्रवाशाला प्रवासाच्या दरम्यान ट्रेन बदलायची असेल किंवा काही काळ स्टेशनवर वाट बघायचे असेल तर तो प्रवासी रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या एसी किंवा नॉन एसी वेटिंग हॉलचा वापर करू शकतो ही सुविधा त्यांना अगदी मोफत मिळते