Indian Railway : भारतीय रेल्वेने मागील चार वर्षांमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी सेवा दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्पन्नात मोठी वाढ केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरानुसार, मालवाहतूक उत्पन्न सुमारे 48.29 टक्क्यांनी वाढून 54,800 कोटी रुपयांवर (Indian Railway) पोहोचले आहे, तर प्रवासी उत्पन्न 40 टक्क्यांनी वाढून 20,024 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
२०१९-२० मध्ये भारतीय रेल्वेचे मालवाहतूक उत्पन्न 1.13 लाख कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 1.68 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यामध्ये 54,805 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, प्रवासी उत्पन्न 2019-20 मध्ये 50,669 कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 70,693 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, ज्यामध्ये 20,024 कोटी रुपयांची वाढ (Indian Railway) झाली आहे.
रेल्वे मंत्री यांनी सांगितले की, फ्लेक्सी फेअर, तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ तिकीटांतून 2019-20 ते 2023-24 दरम्यान साधारणपणे 5.7 टक्के उत्पन्न आले आहे.
आतापर्यंत, १ एप्रिल २०२४ पर्यंत रेल्वे ७९,००० कोच वापरत आहे, ज्यात ५६,००० सामान्य आणि नॉन-एसी स्लीपर कोच आणि २३,००० एसी कोच समाविष्ट आहेत. मंत्री यांनी सांगितले की, नॉन-एसी कोच, ज्यात सामान्य आणि स्लीपर क्लासेसचा (Indian Railway) समावेश आहे, हे ८२ टक्के (सुमारे ५१ लाख) सीट्स घेतात आणि उत्पन्नाचे ५३ टक्के योगदान देतात. तर, एसी कोच १८ टक्के (सुमारे १४ लाख) सीट्स घेतात आणि उत्पन्नाचे ४७ टक्के योगदान देतात.