Indian Railways: भारतातही ट्रेन हायजॅक झाली होती; जुन्या आठवणींना आला नवा उजाळा

Indian Railways
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railways – जागतिक पातळीवर आता एक खळबळजनक घटना घडली आहे. पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मी (BLA) च्या दहशतवाद्यांनी प्रवाशांची एक ट्रेन हायजॅक केली आहे. या अपहरणामुळे पाकिस्तान सरकारला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी ज्या प्रवाशांना ओलीस घेतले आहे त्यामध्ये पाकिस्तानी लष्करातील सैनिक अन अधिकारी आहेत, ज्यामुळे पाकिस्तान सरकारच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. पाकिस्तानमधील या घटनेमुळे भारतातील काही ट्रेन अपहरणाच्या घटना ताज्या होताना दिसत आहेत.

भारतामध्ये अशा प्रकारच्या ट्रेन हायजॅकच्या घटना (Indian Railways)

भारतामध्ये अशा प्रकारच्या ट्रेन हायजॅकच्या घटना याआधी घडल्या आहेत. या भयानक घटनेवर उजाळा टाकला तर भारतात 2013 मध्ये जनशताब्दी एक्स्प्रेस आणि 2009 मध्ये भुवनेश्वर-राजधानी एक्सप्रेसच्या अपहरणाच्या घटना घडल्या होत्या.

जनशताब्दी एक्स्प्रेस अपहरण प्रकरण –

2013 मध्ये मुंबई-हावडा मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला (Indian Railways) अपहरण केले गेले होते . 2001 मध्ये व्यापारी जयचंद वैद्य यांचं अपहरण करणाऱ्या आरोपी उपेंद्र सिंह उर्फ कबरा याची सुटका करणं. कबरा या आरोपीने तुरुंगातून फरार होऊन ट्रेनमध्ये 13 किलोमीटरपर्यंत प्रवाशांना ओलीस ठेवले होते, हा त्या ट्रेन हायजॅक मागचा उद्देश होता. पण काही कालावधीनंतर लष्कराने त्या प्रवासांची सुखरूप सुटका केली होती.

माओवादी अपहरण प्रकरणे –

2009 मध्ये, सशस्त्र माओवाद्यांनी भुवनेश्वर-राजधानी एक्स्प्रेसचे अपहरण केले होते . सुमारे 300 ते 400 माओवाद्यांनी संपूर्ण ट्रेन ताब्यात घेतली होती. अनेक तास प्रवाशी आणि रेल्वे कर्मचारी ओलीस राहिले होते. माओवादी नेत्याची सुटका करण्यासाठी या अपहरणाची योजना रचली गेली होती. माओवाद्यांनी यावेळी प्रवाशांची मारहाण आणि लुटालूट केली होती. याच सोबत 2013 मध्ये बिहारमधील जमुई येथे माओवाद्यांनी गोळीबार करून ट्रेनवर ताबा मिळवला होता. त्यावेळी धनबाद-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेसला ताब्यात घेतले होते. माओवादी नेत्याला सुटका करण्यासाठी ट्रेनमधील (Indian Railways) प्रवाशांना ओलीस धरले होते.

घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना –

अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवासी सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा बनतो. भारत (Indian Railways) आणि पाकिस्तान दोन्ही देशांना अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या अपहरणांच्या घटना टाळता येऊ शकतात.