Indian Railway Jobs 2024 | रेल्वे विभागात तब्बल 18799 पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway Jobs 2024  | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची संधी आहे. या भरतीची आधीसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ न दवडता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. ही भरती असिस्टंट लोको पायलट या पदासाठी होणार आहे. रेल्वे भरती (Indian Railway Jobs 2024 ) बोर्डाने ही भरती काढलेली आहे. नवीन जाहिरातीत रिक्त पदांची संख्या देखील वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ही एक प्रकारची मेगा भरतीच असणार आहे.

या भरती अंतर्गत तब्बल 18 हजार 799 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघालेली आहे. याआधी केवळ 5696 रिक्त जागा होत्या. परंतु या रिक्त जागांची संख्या आता वाढवली आहे या भरतीची अधिसूचना देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही चंदीगड आरआरबीच्या (Indian Railway Jobs 2024 ) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती पाहू शकता.

त्याचप्रमाणे या भरतीसाठी ज्या लोकांनी आधीच अर्ज केलेले आहेत. त्यांना अर्ज करण्याची गरज नसल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. या भरतीचा अर्ज केल्यानंतर उमेदवारांना RRB ने दिलेल्या पाच टप्प्यातील परीक्षांसाठी हजर राहावे लागणार आहे. या भरतीसाठीचे हे टप्पे पार केल्यानंतर त्यांची निवड होणार आहे.

या भरतीच्या पहिल्या प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात सीबीटी म्हणजे संगणक सर्वोत्तम चाचणी असेल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सीबीटी असेल. तिसऱ्या टप्प्यात सीबीएटी म्हणजे संगणक आधारित अभियोग्यता चाचणी होईल आणि चौथ्या टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी होईल. आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतरच उमेदवाराची निवड केली जाईल. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील पाहू शकता. अधिकृत वेबसाईटची लिंक खाली देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा