हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railway Luggage Rules। भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आता रेल्वे प्रवास करत असताना विमानांप्रमाणे किती किलोपर्यंत सामान वाहून नेण्यात येईल याबाबत नवी नियम लागू करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत संसदेत माहिती दिली. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेण्यासाठी रेल्वे कडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून शुल्क आकारले जाईल. रेल्वेत किती किलोपर्यंत सामना घेऊन प्रवास करण्यात येईल याची माहितीही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
संसदेत अश्विनी वैष्णव म्हणाले, सध्या, रेल्वे डब्यांमध्ये प्रवाशांच्या कॅरी-ऑन सामानासाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, दुसऱ्या श्रेणीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३५ किलोपर्यंत मोफत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे आणि ७० किलोपर्यंत शुल्क आकारले जाते.
प्रवासी किती सामान वाहून नेऊ शकतात? Indian Railway Luggage Rules
स्लीपर क्लासच्या प्रवाशांना ४० किलोपर्यंत मोफत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे, कमाल मर्यादा ८० किलो आहे. एसी थ्री टियर किंवा चेअर कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४० किलोपर्यंत मोफत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे. प्रथम श्रेणी आणि एसी टू टियर प्रवाशांना ५० किलोपर्यंत मोफत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे, ज्याची कमाल मर्यादा १०० किलो आहे. प्रथम श्रेणी एसी प्रवासी ७० किलोपर्यंत मोफत सामान वाहून नेऊ शकतात, तर १५० किलोपर्यंत साहित्य असेल तर त्यांना अतिरिक्त पैसे भरून हे साहित्य जवळ ठेवता येईल. Indian Railway Luggage Rules
वैष्णव यांच्या मते, १०० सेमी लांब, ६० सेमी रुंद आणि २५ सेमी उंच बाह्य मापाचे ट्रंक, सूटकेस आणि बॉक्स प्रवाशांच्या डब्यांमध्ये वैयक्तिक सामान म्हणून परवानगी आहेत. जर ट्रंक, सूटकेस आणि बॉक्स, ज्यांचे बाह्य परिमाण कोणत्याही प्रकारे जास्त असतील, तर अशा वस्तू ब्रेक व्हॅन (एसएलआर)/पार्सल व्हॅनमध्ये बुक कराव्या लागतील आणि प्रवासी डब्यांमध्ये नाही. तसेच कोचमध्ये वैयक्तिक सामान म्हणून व्यावसायिक वस्तूंचे बुकिंग आणि वाहतूक करण्यास परवानगी नाही असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.




