Indian Railway| देशभरातील वाढती रेल्वे गर्दी आणि चेंगराचेंगरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे वेटिंग लिस्ट तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकात आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत केली आहे, तसेच, हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात आल्याचे ही त्यांनी म्हणले आहे.
अलीकडील काळात देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाल्याने अपघात आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अशा प्रकारच्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे कुंभमेळा, सण-उत्सव आणि गर्दीच्या काळात तिकीट असलेल्या प्रवाशांपेक्षा अनेक पटींनी जास्त लोक स्थानकांत प्रवेश करत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यामुळे रेल्वेने आता गर्दी नियंत्रणासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवेश फक्त कन्फर्म तिकीटधारकांना
नव्या नियमानुसार, केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच स्थानकात आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाईल. वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांनी स्टेशनवर येण्याऐवजी घरूनच त्यांच्या तिकीटाची स्थिती तपासावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच, तिकीट उपलब्धतेनुसारच विक्री होणार आहे. तर अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरही निर्बंध घालण्यात येणार आहेत.
रेल्वे स्थानकांवर नवीन यंत्रणा लागू (Indian Railway)
रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी वॉर रूम, सीसीटीव्ही नियंत्रण, आणि होल्डिंग एरिया यांसारख्या सुविधा कार्यान्वित केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या गाडीच्या वेळेनुसारच स्थानकात प्रवेश मिळेल. गर्दीच्या काळात स्टेशनच्या बाहेरच प्रतीक्षा क्षेत्र (होल्डिंग एरिया) तयार केला जाणार आहे, जेथे प्रवाशांना त्यांच्या ट्रेनची वेळ येईपर्यंत थांबावे लागेल.
महाराष्ट्रातील प्रमुख स्थानकांवर विशेष लक्ष
सुरुवातीला हा नियम देशभरातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर लागू केला जाणार आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस, पनवेल, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, नागपूर आणि पुणे या आठ महत्त्वाच्या स्थानकांचा त्यात समावेश होण्याची शक्यता आहे. या स्थानकांवर(Indian Railway) विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाणार आहे. काही प्रवाशांसाठी विशेष सवलतीमहत्वाचे म्हणजे, वृद्ध, महिला, अशिक्षित आणि विशेष परिस्थितीत असलेल्या प्रवाशांसाठी काही सवलती दिल्या जाणार आहेत. गरज असल्यास त्यांना प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, अनधिकृत प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे.