Indian Railway : भारतात रेल्वे हे दळणवळणाचे सोयीस्कर आणि प्रमुख साधन मानले जाते. विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने गाडयांना होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाकडून जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातात. गणेशोत्सवासाठी सुद्धा अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. आता दिवाळीकरिता सुद्धा रेल्वेने खास नियोजन केले असून अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला (Indian Railway) आहे. चला जाणून घेऊया …
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून नागपूर हजरत निजामुद्दीन दानापूर गोरखपूर आणि सावंतवाडी या पाच मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांच्या एकूण 88 फेऱ्या होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काय असेल वेळापत्रक? (Indian Railway)
पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट स्पेशल
या गाडीच्या बद्दल सांगायचे झाल्यास २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पुण्याहून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेलआणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहचेल. हजरत निजामुद्दीनहून ही गाडी दर शनिवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पुण्याला (Indian Railway) पोहचेल.
या स्थानकानावर घेणार थांबे
पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट स्पेशल या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, मथुरा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक
२६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दर शनिवारी नागपूरहून रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तसेच ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. पुण्याहून दर रविवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी गाडी सुटेल. ती (Indian Railway) दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल.
या स्थाकांवर घेणार थांबे
पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक या विशेष गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आदी स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
पुणे-दानापूर-पुणे विशेष
25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत दररोज धावणारी ही ट्रेन पुणे आणि दानापूरला जोडेल. पुण्याहून दुपारी 3.30 वाजता निघून तिसऱ्या दिवशी पहाटे 2:00 वाजता दानापूरला पोहोचेल.
परतीचा प्रवास दानापूर येथून पहाटे 5:30 वाजता सुरू होतो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:15 वाजता पुण्यात पोहोचतो.
या स्थाकांवर घेणार थांबे
जबलपूर आणि प्रयागराजसह विविध स्थानकांवर ही गाडी थांबेल.
पुणे-गोरखपूर-पुणे विशेष
22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत नियुक्त केलेली ही विशेष गाडी दररोज सकाळी 6.50 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.00 वाजता गोरखपूरला पोहोचेल. परतीची ट्रेन गोरखपूरहून संध्याकाळी 5:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 3.15 वाजता पुण्यात पोहोचेल.
या स्थाकांवर घेणार थांबे
पुणे-गोरखपूर-पुणे विशेष ही गाडी इटारसी, झाशी आणि लखनौ या मुख्य स्थानकांवर थांबे घेणार आहे.
पुणे-सावंतवाडी रोड-पुणे एसी स्पेशल
22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत चालणारी ही साप्ताहिक एसी स्पेशल पुण्याहून दर मंगळवारी सकाळी 9.35 वाजता निघेल आणि रात्री 10:30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.परतीचा प्रवास बुधवारी रात्री ११.२५ वाजता सावंतवाडी येथून सुरू (Indian Railway) होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पुण्यात पोहोचेल.
या स्थाकांवर घेणार थांबे
पुणे-सावंतवाडी रोड-पुणे एसी स्पेशल ही गाडी रत्नागिरी, कणकवलीसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.