Indian Railway : भारतीय रेल्वे ही अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी सेवा देत आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना तिकीट बुकिंगमध्ये विशेष सवलती मिळतात, काही ठिकाणी त्यांना मोफत प्रवासाचाही (Indian Railway) लाभ मिळतो.
भारतीय रेल्वे लहान मुलांसाठीही तिकीटांमध्ये विशेष सवलत देते. जे प्रवासी मुलांसह प्रवासाचा विचार करत आहेत, त्यांनी या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे. चला तर मग, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
1 ते 4 वर्षांच्या मुलांना तिकीट नाही (Indian Railway)
रेल्वेच्या नियमानुसार, जर तुमच्या मुलाचे वय 1 ते 4 वर्षांच्या दरम्यान असेल, तर त्यांच्यासाठी तिकीट काढण्याची गरज नाही. तसेच, या वयोगटातील मुलांसाठी आरक्षण (रिझर्वेशन) घेण्याचीही आवश्यकता नसते. ते बिनतिकीट रेल्वेत प्रवास करू शकतात.
5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी अर्धे तिकीट आवश्यक
5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अर्धे तिकीट काढावे लागते.
मात्र, त्यांना स्वतंत्र बर्थ (सीट) दिली जाणार नाही.
तुम्हाला त्यांना तुमच्या सीटवरच बसवावे लागेल.
मुलांसाठी स्वतंत्र सीट हवी असल्यास पूर्ण तिकीट काढावे लागेल.
सीट निवडल्यास पूर्ण तिकीट भरणे आवश्यक (Indian Railway)
जर 1 ते 5 वर्षे वयाच्या मुलांसाठी तुम्ही बर्थ (सीट) बुक करण्याचा पर्याय निवडला, तर तुम्हाला पूर्ण तिकीटाचे भाडे भरावे लागेल. दोन वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने लखनऊ मेलच्या AC थर्ड बोगीमध्ये “शिशु बर्थ” (बाळांसाठी विशेष सीट) चा पर्याय दिला होता. त्यामुळे तुम्ही प्रवास करण्यापूर्वी ताज्या अपडेट्स तपासून पाहा. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मुलांसह प्रवास करत असाल, तर या नियमांची माहिती ठेवा आणि तुमचा प्रवास सुखकर बनवा.