Indian Railway | रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आह ती म्हणजे आता रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत ऍडव्हान्स टिकीट बुकिंगचा कालावधी रेल्वेने बदललेला आहे. याआधी भारतीय रेल्वेचे (Indian Railway) रिझर्वेशनसाठी 120 दिवसांचा कालावधी होता. परंतु तो आता निम्मा म्हणजे 60 दिवसांचा करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर रेल्वेचे आधीच तिकीट काढायचे असेल, तर ते प्रवाशाचा 60 दिवस आधी काढता येणार आहे. सुरुवातीला या रिझर्वेशनची मर्यादा 120 दिवस एवढी होती. परंतु आता रेल्वेने एक नवीन निर्णय काढलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2024 पासून होणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या प्रवाशाचा 60 दिवस आधी तिकीट बुक करावे लागणार आहे.
रेल्वे बोर्डाकडून या आगाऊ आरक्षणाबाबतचा परिपत्रक देखील जारी करण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर 2024 पासून आगाऊ आरक्षणाचा कालावधी हा 120 दिवसांवरून 60 दिवस एवढा करण्यात आलेला आहे. यात प्रवाशांच्या तारखेचा समावेश नसला, तरी कालावधी कमी करण्याचे कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे देण्यात आलेलं नाही.
त्याचप्रमाणे रेल्वेकडून (Indian Railway) ताज एक्सप्रेस गोमती एक्सप्रेस यांसह काही गाड्यांच्या आरक्षणाच्या कालावधीत मात्र कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणजेच या गाड्यांच्या आरक्षणाचा कालावधी हा आधीच एवढा होता तेवढाच आहे. सुरुवातीला हा रेल्वेतील प्रवास करताना रिझर्वेशनचा कालावधी हा 60 दिवसांचा होता. परंतु 2015 मध्ये हा निर्णय बदलून रिझर्वेशनचा कालावधी 120 दिवस करण्यात आला होता. परंतु आता 31 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेली 120 दिवसांची रिझर्वेशन रद्द करण्यात येणार आहे. तसेच 60 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे बुकिंग देखील रद्द केले जाणार आहे.