Indian Railway : RVNL ला भारतीय रेल्वेकडून 390 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली

Indian railway ticket cost
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : संपूर्ण भारतात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. एवढेच नाही तर ,मागच्या काही वर्षात भारतातल्या दुर्गम भागाला सुद्धा रेल्वे द्वारे जोडण्याचे काम सुरु आहे. रेल्वे विभाग त्याच्या विस्तारीकरणासाठी आणि अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या अनुषंगाने पावले उचलत आहे. रेल्वे संदर्भांतली एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे. एका नव्या प्रकल्प बांधणीसाठी RVNL कडे भारतीय रेल्वे (Indian Railway) कडून 3.9 अब्ज रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने सरकारी मालकीच्या रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) कडे सुमारे 3.90 अब्ज रुपयांची ऑर्डर दिली आहे.आरव्हीएनएलने केलेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, सीतारामपूर बायपास लाइन बांधण्यासाठी आसनसोल विभागासाठी हा करार आहे. त्यात पुढे म्हटले आहे की पूर्व रेल्वेच्या (Indian Railway) आसनसोल विभागांतर्गत सीतारामपूर बायपास लाईन बांधण्यासाठी RVNL ने पूर्व रेल्वेकडून स्वीकृती पत्र प्राप्त केले आहे.

3.9 अब्ज रुपयांची ऑर्डर (Indian Railway)

“प्रकल्पाची किंमत जीएसटीसह 3.9 अब्ज रुपये आहे आणि प्रकल्पाचा कालावधी 24 महिने आहे,” रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत, RVNL कडे रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन, निधी आणि अंमलबजावणीची (Indian Railway) जबाबदारी आहे