Indian Railway Rule : वेटिंग तिकीट घेऊन प्रवास केल्यास होईल दंड ? काय सांगतो रेल्वेचा नवा नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway Rule : जर तुम्ही रेल्वेने नियमित प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून एक महत्वपूर्ण नियम जारी करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने नुकतेच वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

आतापर्यंत ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी होते ते स्लीपर किंवा एसीमध्ये वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करत होते. त्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूंच कन्फर्म तिकीट असलेल्या बर्थवर सुद्धा होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने हा नवा नियम (Indian Railway Rule) जारी केला आहे.

… तर ठोठावण्यात येणार दंड (Indian Railway Rule)

जे लोक कन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेकडून जबर दंड आकारण्यात येणार आहे. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशाने आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास त्याला 440 रुपये दंड आकारला जाईल आणि ट्रेन तिकीट अधिकारी (TT) त्याला मध्यभागी सुद्धा उतरवू शकतात.
याशिवाय प्रवाशांना जनरल डब्यात पाठवण्याचा अधिकार टीटीला असेल. दुसरीकडे, वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशाने स्लीपर कोचमध्ये प्रवास केल्यास त्याला 250 रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि पुढील स्थानकावर उतरवले (Indian Railway Rule) जाईल.

प्रवाशांनी काय करावे ? (Indian Railway Rule)

  • रेल्वेच्या नियमानुसार प्रतीक्षा यादीतील तिकिटावर प्रवास करणे बेकायदेशीर आहे.
  • तुम्ही खिडकीच्या काउंटरवरून तिकीट घेतले असेल, तर तुम्ही प्रतीक्षा यादीतील तिकिटावर जनरल डब्यात प्रवास करू शकता.
  • ऑनलाइन बुक केलेल्या प्रतिक्षा यादीतील तिकिटांवर म्हणजेच ई-तिकीट असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी नाही.
  • तुमची प्रतीक्षा यादी तिकीट ऑनलाइन असेल, तर चार्ट तयार झाल्यानंतर, IRCTC ते आपोआप रद्द करेल आणि तुम्हाला परतावा मिळेल.
  • रिफंडची रक्कम तुमच्या खात्यात येते रिफंड रक्कम येण्यासाठी 3-4 दिवस लागू शकतात.
  • जर तुमचे तत्काळ तिकीट देखील प्रतीक्षा यादीत असेल आणि प्रवासाच्या दिवसापर्यंत ते कन्फर्म झाले नसेल तर तुम्ही त्या तिकिटावर प्रवास करू शकत नाही. तत्काळ हे वेटिंग तिकीट असल्यास, तिकीट रेल्वे आपोआप रद्द करते.
  • जर तुमचे तिकीट RAC (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असेल, तर याचा अर्थ तुम्हाला (Indian Railway Rule) ट्रेनमध्ये जागा मिळेल, परंतु तुम्हाला ती जागा दुसऱ्या प्रवाशासोबत शेअर करावी लागेल. या प्रकरणात, आपण प्रवास करू शकता.

वेटिंग तिकिटांसाठी काय आहेत नवीन नियम

भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, जर तुम्ही खिडकीतून तिकीट खरेदी केले असेल आणि ते तिकीट प्रतीक्षा यादीत राहिले तर तुम्ही ते रद्द करून पैसे परत मिळवू शकता. मात्र अनेक प्रवासी ती रद्द करण्याऐवजी प्रवास करण्यासाठी ट्रेनमध्ये चढतात. रिफंड पॉलिसी (Indian Railway Rule) अंतर्गत, रद्द केल्यानंतर तुमच्या तिकिटाची संपूर्ण रक्कम परत केली जाईल.