Indian Railway : ट्रेनचे तिकीट 2 मिनिटांत होईल कन्फर्म ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे बहुतांश लोक हे परवडणारा आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. परंतु अनेकदा जर तुमचे प्लान काही अचानक ठरले असतील तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. विशेषतः सुट्टीच्या हंगामामध्ये वेटिंगवर अनेक प्रवासी असतात. मात्र रेल्वे कडून अशा प्रवासांसाठी खास सोय करण्यात आली असून अगदी काही साध्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळू शकतं. त्यामुळे तुमचे प्लानिंग (Indian Railway) मात्र खराब होणार नाही हे नक्की. चला तर मग पाहूया हे रेल्वेचे कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं

भारतीय रेल्वेकडून आयत्यावेळी हमखास प्रवासासाठी तात्काळ तिकीटची सुविधा दिली जाते. या सुविधेनुसार आपला प्रवास आदल्या दिवशी तात्काळ कोटातून तिकीट काढून हमखास कन्फर्म तिकीट काढू शकतो. हे तात्काळ तिकीट कसं काढायचं? या तात्काळ (Indian Railway) तिकीट बुकिंग ची ठराविक वेळ दिलेली असते त्याच वेळेत हे तिकीट काढावे लागते.

  • सर्वात आधी तिकीट बुकिंग साठी तुम्हाला आय आरसीटीसी ची वेबसाईट (Indian Railway) उघडायची आहे.
  • त्यानंतर होमपेज च्या बाजूला उजव्या कोपऱ्यात मेनूचा पर्याय दिसेल इथे तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर तिकीट बुक वर क्लिक करा
  • त्यानंतर फॉर्ममध्ये तुम्ही प्रवास सुरू करणाऱ्या बोर्डिंग स्टेशनचं नाव टाका त्यानंतर तुमच्या डेस्टिनेशन च नाव TO या कॅटेगरीच्या मध्ये टाका.
  • त्यानंतर Tatkal पर्यायाला सिलेक्ट करा. हा बाय डिफॉल्ट General वर सेट असतो.
  • त्यानंतर प्रवासाची तारीख टाका, डिटेल्स टाकल्यानंतर (Indian Railway) सर्चवर क्लिक करा.
  • त्यानंतर त्या मार्गाने जाणाऱ्या अनेक ट्रेनची नावे दिसतील
  • त्यानंतर तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये ज्या श्रेणीची तिकीट काढायची त्यावर क्लिक करुन बुक नाऊवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला प्रवाशाची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल.
  • तात्काळ तिकीट काढताना वेग दाखविणे गरजेचे आहे. जर तुम्ही मास्टर लिस्ट (Indian Railway) आधी तयार करुन ठेवली असेल तर तुम्हाला तपशिल भरायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही एका क्लिकवरच पॅसेंजर समाविष्ट करु शकता.
  • त्यानंतर इतर तपशील भरावा, कॅप्चा टाकावा, मोबाईल नंबर टाकावा, त्यानंतर तुम्हाला (Indian Railway) पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल, त्यानंतर तुम्ही पेमेंट करावे. त्यानंतर तुमचे तात्काळ तिकीट बुक होईल.