Indian Railway : देशभरामध्ये दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशा सर्व प्रवाशांसाठी आता रेल्वे विभागाने खुशखबर दिली आहे. रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहून आता सुट्ट्या पैशांसाठी झगडत बसावे (Indian Railway) लागणार नाही. कारण आता रेल्वे स्थानकांवर UPI द्वारे जनरल तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे.
कधीपासून अंमलबजावणी ? (Indian Railway)
1 एप्रिलपासून रेल्वेच्या जनरल तिकिटांच्या पेमेंटसाठी डिजिटल QR कोडलाही मान्यता देण्यात आली आहे, ज्याद्वारे तुम्ही UPI द्वारे तुमचे सामान्य रेल्वे तिकीट देखील खरेदी करू शकता. रेल्वे स्थानकांवरील लांबलचक गर्दीपासून (Indian Railway) प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. रेल्वेने आता रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकीट काउंटरवरही ऑनलाइन तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा
96 स्थानकांवर ही सेवा (Indian Railway)
याबाबत माहिती देताना अजमेर विभागाचे वरिष्ठ डीसीएम सुनील महाला म्हणाले की, विभागातील 96 स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यासाठी 31 मार्चपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. रेल्वेच्या या नवीन सेवेमध्ये लोक रेल्वे (Indian Railway) स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरवर QR कोडद्वारे पेमेंट देखील करू शकतील. यामध्ये पेटीएम, गुगल पे आणि फोन पे सारख्या प्रमुख UPI मोडद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. दरम्यान कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे याची नवे अद्याप जाहीर केलेली नाही.