Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय!! सणासुदीच्या काळात 34 विशेष ट्रेन चालवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात फेस्टिव्ह सीजन सुरु आहे. सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. त्यातच अनेकजनाचे इतरत्र दसरा साजरा करण्यासाठी प्लॅनही सुरु आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास (Indian Railways) करणाऱ्याची संख्या सुद्धा वाढणार आहे. अशावेळी प्रवाशांना नाहक त्रास होऊ नयेत आणि प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी रेल्वेने विशेष ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्या कुठून कश्या सोडल्या जातील हे जाणून घेऊयात.

सणासुदीसाठी 34 विशेष गाड्यांचे नियोजन : Indian Railways

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून 34 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विशेष  रेल्वेगाड्या 15 ऑक्टोबर ते 11 डिसेंबर या दरम्यान रेल्वे विभागाच्या  माध्यमातून चालवल्या  जाणार आहेत. 15 ऑक्टोबर ते 11 डिसेंबर या कालावधीत  34 रेल्वेगाड्याच्या माध्यमातून 377 फेऱ्यांचे नियोजन  रेल्वे विभागामार्फत करण्यात आले आहे. यामधील 351 फेऱ्या देशाच्या पूर्वेकडील भागात व उर्वरित उत्तर भागात केले जाणार आहे.

रेल्वेच्या 69 रेल्वेगाडयांनाअधिकचे डब्बे जोडणार :

रेल्वे विभागाद्वारे (Indian Railways) चालवण्यात येणाऱ्या आधीच्या रेल्वेगाड्यांची प्रवासी बसण्याची क्षमता वाढवण्यात येणार असून त्यासाठी रेल्वेच्या 69 रेल्वेगाडयांना अधिकचे डब्बे जोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सणासुदीच्या दरम्यान चालवण्यात येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या वेळेत स्थानकात पोहचतील याची सर्वोतपरी काळजी रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. रेल्वेमार्फत चालवण्यात येणाऱ्या सर्व विशेष रेल्वेगाड्यांची माहिती रेल्वेने आपल्या समाज माध्यमातून प्रकाशित  केली आहे.

उत्तरेचे महाव्यवस्थापक शोभन चौधरी यांनी याबाबत माहिती देताना म्हंटल कि, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तसेच जर काही आणखी गरज लागली तर अजून काही विशेष गाड्या सुरु करण्यात येतील. या अतिरिक्त गाड्या आमच्यासाठी इतर गाड्यां इतक्याच महत्त्वाच्या आहेत आणि मी विशेष गाड्यांमधून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना खात्री देतो की प्रवास करत असताना त्यांचा वक्तशीरपणा राखला जाईल.