Indian Railways : रेल्वेच्या Ac 1, Ac2 आणि Ac3 कोच मध्ये फरक काय असतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे (Indian Railways) हा भारतीयांसाठीचा सर्वात सोयीचा आणि खिशाला परवडणारा प्रवासी पर्याय आहे. खास करून लांबच्या प्रवासासाठी रेल्वे सारखा दुसरा आरामदायी असा प्रवास नाही. त्यामुळे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करायला आपलं प्राधान्य देतात. रेल्वे प्रवास करत असताना आत्तापर्यन्त तुम्ही आरामदायी प्रवासासाठी AC1, AC2, AC3 सारखे तिकीट बुक करतात. पण तुम्हाला माहितीये का की यामध्ये फरक नेमका काय आहे? चला तर मग आज आपण याबाबत जाणून घेऊयात.

काय आहे फरक? Indian Railways

AC1-

AC1म्हणजे फर्स्ट क्लास एसी होय. AC1हा रेल्वेचा (Indian Railways) सर्वात मोठा आणि महागडा कोच आहे. हा कोच पूर्णपणे वातानुकुलीत असतो. तसेच यात 2 ते 4 बर्थ असतात. त्यातील 2 हा कुप आणि 4 था केबिन म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे येथे जेवण हे अत्यंत उच्च दर्जाचे भेटते. तसेच जेवण सर्व्ह करण्यासाठीही उत्तम सोय असते. तसेच येथील सीट देखील अत्यंत आरामशीर असते.

AC 2-

AC 2 हा कोच देखील AC1 सारखाच असतो. मात्र याचे तिकीट हे AC1 पेक्षा स्वस्त असते. हा कोच वातानाकुलीत असते. AC2 हा कोच मध्यम स्वरूपाचा आहे. यामध्ये प्रत्येक डब्यात वरती, मध्यभागी आणि खाली असे एकूण 6 सीट असतात. तसेच यात बर्थ नसते. तसेच या कोच मध्ये प्रवाश्यांना झोपण्यासाठी आरामदायी गाडी, चादर आणि उश्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

AC3

AC3 हे रेल्वेचा थर्ड क्लास कोच आहे. हा कोच AC1, AC2 च्या तुलनेत हा अत्यंत कमी असते. त्यामुळे सामान्य लोक थोड्याबहुत प्रमाणात याचा वापर करतात. यात एकूण 8 सीट असतात. हा डब्बा स्लीपर कोचसारखा असतो. तसेच यात खालच्या सीटचा वापर करून मधले सीट तयार केले जाते. यामध्ये जेवण थर्ड एसीचे जेवन हे सेकंड कोचच्या जेवणाप्रमाणेच असते. मात्र यात चादर, गाडी, पडदे यारख्या सुविधा नसतात.