Indian Railways: लहान मुलं कधीकधी एवढे मोठे धाडस करतात की त्यांचे हे धाडस चर्चेचा विषय बनतो. अशीच एक घटना बिहार मध्ये घडली आहे. एका 11 वर्षाच्या मुलाने लाल रुमाल दाखवून ट्रेन थांबवली आणि 1500 प्रवाशांचे प्राण वाचवले. या धाडसी मुलाचे नाव आहे शाहबाज. शाहबाजच्या या धाडसामुळे रेल्वे खात्याकडूनही त्याचा सन्मान (Indian Railways) केला जाणार आहे.
स्वतः जखमी होऊनही वाचवले प्राण (Indian Railways)
शनिवारी समस्तीपूर मुझफ्फरपूर रेल्वे विभागातील भोला टॉकीज गुमती क्रमांक 53A पासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकला तडा गेला होता. याचवेळी न्यू कॉलनी वॉर्ड नंबर 27 येथील रहिवासी असलेले मोहम्मद शकील यांचा मुलगा सहवास आपल्या वडिलांना नाश्ता देऊन रेल्वे ट्रॅकच्या इकडून घरी परतत होता. तेव्हा त्याची नजर ही रेल्वे ट्रॅक वर पडली. रेल्वे ट्रॅकला क्रॅक गेल्याचे दिसले. आणि त्याच्या लक्षात आलं की येणाऱ्या रेल्वेला आपण थांबवलं पाहिजे. आपल्या चौकस बुद्धीचा वापर करत या मुलाने समस्तीपुर ते मुजफ्फरपुर जाणारी रेल्वे (Indian Railways) क्रमांक 13019 काठगोदाम एक्सप्रेसला लाल रंगाचा रुमाल दाखवत थांबण्याचा इशारा केला. हे सर्व करत असताना शहबाजला दुखापत ही झाली. मात्र शहबाज आपल्या अतुलनीय धाडसामुळे रेल्वेला थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला. त्यानंतर ट्रेनच्या ड्रायव्हरने लाल रुमाल पाहिल्यानंतर असं करण्याचं कारण विचारलं. शहबाजने रेल्वेचे ट्रॅकला क्रॅक गेल्याच्या बद्दल माहिती सांगितली. त्यानंतर याबाबतची माहिती लगेचच ड्रायव्हरने कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर रेल्वे ट्रॅक ठीक करण्यात आला आणि 45 मिनिटांनंतर ट्रेन पुढे रवाना झाली.
शहबाज बनला चर्चेचा विषय (Indian Railways)
केवळ 11 वर्षाच्या शहबाज ने पंधराशे लोकांचे प्राण वाचवले त्यामुळे शहबाजच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असून शहाबाज हा चर्चेचा विषय बनला आहे. एवढेच नाहीतर शहबाच्या घरी पोहोचून लोकांनी त्याचं कौतुक केलं. तेथील रहिवासी असलेले समाजसेवक रणजीत निर्गुणी यांनी शाहबाजला पुस्तक पेन, चॉकलेट अशा गोष्टी देऊन त्याचा सन्मानही केलाय. याशिवाय रेल्वेने देखील शहबाच्या या धाडसाबद्दल (Indian Railways) त्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
समस्तीपूर रेल्वे विभागाचे डीआरएम विनय श्रीवास्तव यांनी सांगितले की मुलाने खूप चांगले काम केले आहे. अशी जाणीव (Indian Railways) प्रत्येक लहान मुलामध्ये यावी अशी आमची आशा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. त्यामुळे बुधवारी या मुलाला बोलावून प्रमाणपत्र व अभ्यासाचे साहित्य देऊन त्याचा गौरव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.