Indian Railways : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; डब्ब्यात जोडले जाणार अँटी इंज्युरी फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. रोज लाखो लोक  रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे ही भारतीयांच्या खिशाला परवडेल असे माध्यम आहे. त्यामुळे याचा वापर अधिक केला जातो. प्रवाश्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र रेल्वेचे अपघात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून चिंतेची बाब ठरली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वे ‘अँटी इंज्युरी’ डब्बे जोडण्याच्या विचारात आहे. याबाबत बोलताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा निर्णय घेण्यामागे रेल्वेतील सुरक्षेची पातळी वाढवणे हा उद्देश आहे. तसेच रेल्वेच्या डब्यातील आतील फिटिंग्जमध्ये बिघाड आणि अपघात घडू शकतील असे हँगर असल्यामुळे त्यात बदल करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या (Indian Railways) डब्यात प्रवाश्यांना पकडण्यासाठी जे हँगर लावलेले आहेत. ते धातूपासून बनवले आहेत. तसेच प्रवासी सामान ठेवतात तेही रॅक खराब झाले आहेत. त्यामुळे जेव्हा रेल्वेला ब्रेक लावला जातो. तेव्हा प्रवाश्याच्या डोक्यात ते पडून अनुचित घटना घडू शकते. याची दखल घेतली गेल्यामुळे याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. असे सांगण्यात आले आहे. यासाठी भारतीय रेल्वे ICF ने डिझाइन केलेले डबे Linke Hofmann Busch (LHB) कोचने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  जर्मनने डिझाइन केलेल्या LHB डब्यांचे वैशिष्ट्य म्हणजे जरी अपघात झाला तर डब्बे एकमेकांवर चढले जाणार नाहीत याची काळजा घेते. म्हणून याचा वापर करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे.

मागील ४ महिन्यात ३ अपघात – Indian Railways

हा निर्णय घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, केवळ चार महिन्यात रेल्वे अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. पुन्हा अश्या घटना घडू नयेत यासाठी रेल्वेचा निर्णय महत्वाचा ठरतोय.बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातानंतर एकूण 238 प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता तर 650 प्रवासी जखमी झाले होते. त्यामुळे यावर खबरदारी म्हणून रेल्वेची सुरक्षा वाढवणे महत्वाचे होते. आणि तो निर्णय आता घेण्यात आल्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.