Indian Railways : भारतामध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची महत्वाची भूमिका आहे. भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातच आता रेल्वे नेटवर्क चे जाळे आणखी वाढणार आहे. बिहार-पश्चिम बंगालसह सात राज्यांना मोठी भेट देत केंद्र सरकारने शुक्रवारी संबंधित राज्यांच्या आठ नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे कनेक्टिव्हिटीशी संबंधित पायाभूत सुविधांना चालना मिळेल, असे पंतप्रधान (Indian Railways) मोदींनी म्हटले आहे. याशिवाय रोजगारही निर्माण होईल.
वाहतुकीची कार्यक्षमता वाढणार (Indian Railways)
या प्रकल्पांबाबत सरकारने माहिती देताना सांगितले आहे की, यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवास सुलभ होईल आणि तेल आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रस्तावित प्रकल्पांमुळे वाहतुकीची कार्यक्षमता सुधारेल आणि संपर्क नसलेल्या भागांना जोडून वाहतूक नेटवर्क सुधारेल. यामुळे पुरवठा साखळी सुरळीत होईल आणि आर्थिक विकासाला गती मिळेल.
प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन होणार कमी
ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत 24,657 कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमुळे 767 कोटी किलो कार्बन उत्सर्जन (Indian Railways) कमी होईल. हे 30 कोटी झाडे लावण्याइतके आहे. असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
कोणत्या राज्यांचा समावेश ? (Indian Railways)
या प्रकल्पांमध्ये ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमधील 14 जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे सध्याचे रेल्वे नेटवर्क 900 किलोमीटरने वाढेल. या प्रकल्पांतर्गत 64 नवीन स्थानके बांधली जातील, ज्यामुळे सहा महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांशी (पूर्व सिंगभूम, भदाद्री कोठागुडम, मलकानगिरी, कालाहांडी, नबरंगपूर, रायगड), सुमारे 510 गावे आणि 40 लाख (Indian Railways) लोकांशी संपर्क वाढेल.
अजिंठा वेरूळ रेल्वे नेटवर्कने जोडले जाणार
महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर महाराष्ट्राला सुद्धा मोठी भेट मिळणार आहे. कारण या नव्या प्रकल्पानुसार युनेस्को वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेणीला लवकरच रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रयत्न विकासाला चालना मिळणार आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. रेल्वे सेवा सुरु झाली तर येथील आर्थिक (Indian Railways) विकासाला बळ मिळणार आहे.