Indian Railways : मराठवाड्यातून थेट गाठता येणार मुंबई, दिल्ली ; जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railways : शुक्रवारी झलेल्या एका केंद्रीय कॅबिनेट बैठकीत देशातल्या सात राज्यांमध्ये आठ नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याविषयी माहिती देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्राला दोन प्रकल्प मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकल्प म्हणजे अजिंठा वेरूळ लेण्यांपर्यंत रेल्वेचे जाळे पसरवले जाणार आहे. तर दुसरी एक आनंदाची बाब म्हणजे जालना – जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राचे मंजुरी मिळाली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांचे (Indian Railways) आभार मानले आहेत. याबाबत ट्विट करत त्यांनी पोस्ट शेअर (Indian Railways) केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ”केंद्राने महाराष्ट्राला आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो. जालना जळगावच्या नव्या रेल्वे लाईन मुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जोडला जाणार (Indian Railways) आहे”. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

जालना-जळगाव रेल्वे लाईन

जालना – जळगाव 174 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामध्ये राज्य सरकारचा एकूण प्रकल्प किमतीच्या 50% खर्च म्हणजे 7105.43 कोटींपैकी 3552.715 कोटी रुपयांचा हिस्सा आहे. यात जमिनीची किंमत अंतर्भूत असेल. जालना – जळगाव नवीन रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा फायदा मराठवाडा आणि खानदेश भागातील स्थानिक उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प जालना- राजुर- सिल्लोड- अजिंठा- जळगाव असा (Indian Railways) आहे.

अजिंठा वेरूळ रेल्वे नेटवर्कने जोडले जाणार

या नव्या प्रकल्पानुसार युनेस्को वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेणीला लवकरच रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रयत्न विकासाला चालना मिळणार आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. रेल्वे सेवा सुरु झाली तर येथील आर्थिक (Indian Railways) विकासाला बळ मिळणार आहे.