व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Indian Railways : रेल्वेने बदलला 1 नियम अन् झाली 2800 कोटींची कमाई; कसे ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उत्सुक असतात. कारण रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुखकर असतो. त्यामध्ये भारतीय रेल्वेचे जाळे भारतात सर्वदूर पसरलेले आहे. परंतु रेल्वेचा प्रशासकीय नफा मात्र वाढत नव्हता. त्यामुळे रेल्वेने काही नियमांमध्ये बदल करण्याचे ठरवले. त्या नियमांमधील बदलामुळे रेल्वेला तब्बल 2800 कोटी रुपयांचा नफा झालेला पाहायला मिळत आहे.

काय केला होता नियम? Indian Railways

रेल्वे विभागाने 31 मार्च 2016 ला 5 वर्षे ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना जर राखीव कोचमध्ये स्वतंत्र बर्थ किंवा सीट आवश्यक असेल तर त्यांना पूर्ण भाडे आकारण्याचा नियम केला. त्यानुसार तुम्ही जर तुमच्या संपूर्ण परिवाराला घेऊन प्रवास करत असाल तर तुमच्या सोबत असलेल्या लहान मुलांसाठी खास जागा बुक करताना तुम्हाला त्या तिकिटाचे पुर्ण पैसे भरावे लागणार होतो. त्यामुळे रेल्वेला पुढील सात वर्षात या नियम बदलामुळे 2800 कोटी रुपयाचा नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये रेल्वेने या नियमात केलेल्या सुधारनेमुळे 560 कोटी रुपयांचा नफा गोळा केला आहे.

70 % मुलांनी घेतला या योजनेचा फायदा

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागील सात वर्षात रेल्वेने (Indian Railways)  प्रवास केलेल्या 5 वर्षे ते 12 वर्षे वयोगटातील मुलांपैकी तब्बल 70 % मुलांनी पूर्ण भाडे भरून प्रवास केला आहे. आयटीआयच्या माहितीनुसार 10 कोटीहुन अधिक मुलांनी स्वतःसाठी स्वातंत्र बर्थ राखीव ठेवत त्यासाठी पुर्ण पैसे मोजले आहेत. तसेच 3.6 कोटी मुलांनी अर्धे तिकीट घेत आपल्या पालकांसोबत एकाच बर्थवर प्रवास केला आहे.

आधी काय नियम होता

21 एप्रिल 2016 पूर्वी 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना अर्धे तिकीट आकारले जात होते. आणखी एक पर्याय होता की जर मुलाने स्वतंत्र बर्थ घेण्याऐवजी सोबतच्या प्रौढ व्यक्तीच्या बर्थवर प्रवास केला तर त्याला अर्धे भाडे द्यावे लागेल.