व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Indian Railways : आता SL डब्याच्या जागी बसवले जाणार इकॉनॉमी कोच; तिकीट किती महागणार ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) हे देशातील सर्वसामान्य प्रवाश्यासाठी प्रवासाचे उत्तम साधन आहे. आरामदायी आणि कमी पैशात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे विभागही प्रवाशांच्या सोयी- सुविधेसाठी सतत तत्पर असते आणि नवनवीन बदल घडवत असते. आताही रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून आता SL डब्याच्या जागी इकॉनॉमी कोच बसवले जाणार आहेत.

रेल्वे स्लीपर कोच हटवणार :  (Indian Railways)

सध्या भारतीय रेल्वे (Indian Railways) स्लीपर कोचेस हटवून त्याजागी प्रवासी सुविधेत वाढ व्हावी या उद्देशाने 3 AC इकॉनॉमी कोचेस बसवले जाणारआहे. परंतु सुविधेत वाढ केली तर तिकिटंच्या दरात देखील वाढ होईल अशी भीती प्रवाश्यामधून व्यक्त होत आहे. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तिकीट दर 3 AC पेक्षा कमीच असतील असं म्हंटल जात आहे.

जर तुमच्या तिकिटावर M लिहिले असेल तर तुम्हाला 3 AC इकॉनॉमीमध्ये बसावे लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा 3 AC व्यतिरिक्त कोणता डबा आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे डबे फक्त काही गाड्यांमध्ये जोडले गेले आहेत, ज्यामध्ये सुविधा थर्ड एसी सारख्याच आहेत, परंतु थर्ड एसी पेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. हे थर्ड एसी पेक्षा कमी आरामदायी मानले जाऊ शकतात आणि त्यांचे भाडे देखील थर्ड एसी भाड्यांपेक्षा कमी असेल .

काय असेल 3AC आणि 3 AC इकॉनॉमी मधील फरक :

3AC मध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 6 बर्थ आणि 2 साइड बर्थ आहेत. त्यात खालची बाजू आणि वरची बाजू यांच्यामध्ये मधला बर्थ नाही.

तर, 3 AC इकॉनॉमीमध्ये 3 बाजूचे बर्थ आहेत, ज्यामुळे प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एकूण 9 बर्थ आहेत. यात वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूच्या दरम्यान अतिरिक्त बर्थ आहे.

3 AC इकॉनॉमीमध्ये बर्थ क्षमता 72 वरून 83 पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर 3 AC  कोचची बर्थ क्षमता 72 आहे.