Indian Railways : आता चालत्या ट्रेनमध्ये शोधा रिकाम्या सीट्स; वेटिंग तिकिटावरही प्रवास होईल आरामदायी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ट्रेनने (Indian Railways)  प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दररोज हजारोंच्यावर प्रवासी ट्रेनचे रिझर्वेशन करत असतात. मात्र अनेकवेळा सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे करण्यात आलेले रिझर्वेशन सीट कन्फर्म होत नाही. त्यामुळे वेटिंग तिकिटावर प्रवाश्यांना प्रवास करण्याची वेळ येते. या वेटिंग तिकिटावर प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांचा संपूर्ण प्रवास हा दगदगीत जातो.

या पार्श्वभूमीवर प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊनच रेल्वे विभागाकडून उत्कृष्ट अशी सेवा आणण्यात आली आहे. आता इथून पुढे प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये आपली रिझर्व्ह किंवा रिकाम्या सीट शोधण्यासाठी टीसीच्या मागे पळावे लागणार नाहीये. कारण आता आपल्याला इथून पुढे रेल्वेच्या वेबसाईट आणि ॲपद्वारे एखाद्या भोगीमध्ये किती रिकाम्या सीट्स आहेत हे जाणून घेता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया धावत्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट मिळाले असता रिकाम्या जागा कशा शोधायच्या.

या स्टेप्स फॉलो करा- Indian Railways

तुम्ही जर ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमचे जर रिझर्वेशन कन्फर्म नसेल तर तुम्हाला नक्कीच एका रिकाम्या सीटची गरज भासेल. अशावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलवर IRCTC वेबसाइट ओपन करा. IRCTC च्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला बुकिंग बॉक्सच्या वर “चार्ट्स/व्हॅकन्सी” पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर reservation चार्ट पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये ट्रेनचे नाव/नंबर आणि दुसऱ्या बॉक्समध्ये बोर्डिंग स्टेशन टाकावे लागेल. यानंतर Get Train Chart वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रेनमध्ये किती जागा रिकाम्या आहेत याची माहिती मिळेल.

दरम्यान, तुम्ही IRCTC चे ॲप देखील फोनमध्ये डाऊनलोड करून ही माहिती जाणून घेऊ शकता. यापूर्वी अनेक वेळा प्रवाशांना कन्फर्म रिझर्वेशन नसल्यामुळे ट्रेनमध्ये सतत जागा बदलत प्रवास करावा लागत होता. मात्र प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे विभागाने (Indian Railways) ही नवीन सोय आणली आहे. ज्यामुळे आपल्याला फोनवर ट्रेनमध्ये असणाऱ्या रिकाम्या जागांची माहिती मिळू शकते.