हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । मराठवाडा आणि विदर्भांतील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारी काचीगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेन उद्यापासून म्हणजे २० जुलै पासून नियमितपणे धावणार आहे. या एक्सप्रेस ट्रेनची देखभाल आणि संचालन दक्षिण मध्य रेल्वे (SCR) झोनद्वारे केले जाईल. ही गाडी या मार्गावरील अनेक प्रमुख धार्मिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडते. आणि महत्वाची बाब म्हणजे ती आपल्या महाराष्ट्रातून धावेल. खरंतर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी ही गाडी नियमितपणे सुरू करावी अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत हा हि एक्सप्रेस दररोज सूरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
काचेगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेन अंदाजे १९५३ किमी अंतर कापेल. ट्रेन क्रमांक १७६०५/१७६०६ असं या रेल्वेचा (Indian Railways ) क्रमांक आहे. ट्रेन क्रमांक १७६०५ काचेगुडा-भगत की कोठी एक्सप्रेस २०.०७.२०२५ पासून दररोज २३:५० वाजता काचेगुडा स्टेशनवरून निघेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २०:०० वाजता भगत की कोठी स्टेशनवर पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक १७६०६ भगत की कोठी-कचेगुडा एक्सप्रेस २२.०७.२०२५ पासून दररोज २२:३० वाजता भगत की कोठी स्टेशनवरून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १५:४० वाजता काचेगुडा स्टेशनवर पोहोचेल.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा ? Indian Railways
काचेगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेन (Indian Railways ) या संपूर्ण प्रवासादरम्यान २९ स्थानकांवर थांबेल. यांमध्ये निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, संत हिरडाराम नगर, सिहोर, मकसी, उज्जैन, रतलाम, जावरा, मंदसौर, नीमच, चित्तौड़गड, बिजराबाद, बिज्जाबाद, भिलवार, अ. सोजत रोड, मारवाड आणि पाली मारवाड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
ट्रेनची रचना कशी असेल?
काचेगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोन सेकंड AC , सात थर्ड एसी, 7 स्लीपर, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन असतील. काचेगुडा ते भगत की कोठी दरम्यान स्लीपर क्लासचे भाडे ७७० रुपये, एसी ३ टियरचे भाडे २०३० रुपये आणि एसी २ टियरचे भाडे २९३० रुपये असेल .




