Indian Railways : बापरे!! ड्रायव्हर शिवाय 84 KM धावली ट्रेन; रेल्वे विभागात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railways । एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथील एक रेल्वे मालगाडी ड्रायव्हर शिवाय धावली. जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर हि ट्रेन थांबली होती. परंतु ही मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने जाऊ लागली. उतारामुळे ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय सुसाट धावत गेली (Train Ran Without A Driver) असं म्हंटल जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 84 किलोमीटरपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हर शिवाय धावत गेली. या संपूर्ण प्रकारामुळे रेल्वे विभागात खळबळ उडाली असून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत.

नेमकं काय घडलं- Indian Railways

याबाबत अधिक माहिती अशी कि, कठुआ रेल्वे स्टेशनवर या ट्रेनचा ड्रायव्हर चहा पिण्यासाठी रेल्वेतून खाली उतरला. मात्र त्यावेळी ट्रेनचे इंजिन सुरूच होते आणि चालकाने हँडब्रेक सुद्धा लावला नव्हता. त्यातच रेल्वे रुळावर उतार असल्याने ट्रेनने अचानक वेग घेतला आणि रेल्वे धावत सुटली. यानंतर जेव्हा चालकाने गाडी सुरू झाल्याचे पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. रेल्वे प्रशासनाकडून ही ट्रेन थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र गाडी थांबवण्यात यश मिळत नव्हते. अखेर दसुहाजवळील उंच बस्ती परिसरात पॅसेंजर गाड्यांचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली. मात्रतोपर्यंत ट्रेनने 84 किलोमीटर अंतर कापले होते.

महत्वाची गोष्ट म्हणजे, सुदैवाने या रेल्वे ट्रॅकवर इतर कुठलीही ट्रेन नव्हती. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र विचार केला तर हि मोठी गंभीर घटना आहे. त्यानुसार या संपूर्ण प्रकारची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून याबाबतच सखोल चौकशीचे आदेश रेल्वे विभागाकडून (Indian Railways) देण्यात आलेले आहेत. या घटनेची कारणे शोधण्यासाठी फिरोजपूर येथून एक पथक सुद्धा तातडीने पाठवण्यात आले आहे.