Indian Railways : नाताळनिमित्त रेल्वे सोडणार विशेष गाड्या; पहा कसं असेल वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेकडून (Indian Railways) जसे सणासुदीचे दिवस चालू आहेत तसे नवीन व स्पेशल गाड्याची जणू काही आरास घातली जात आहे. दिवाळी, दसरा, छठपूजेनिमित्त रेल्वेकडून गाड्या सोडण्यात आल्या होत्या. आता पुढील महिन्यात नाताळ सुरु होणार असून नाताळ निमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी रेल्वेकडून काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्या नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

एकूण ८ गाड्या चालवल्या जाणार

रेल्वेकडून (Indian Railways) या काळात एकूण ८ गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामध्ये ट्रेन क्रमांक 01453 टिळक ते मंगळुरु, गाडी नंबर 01454 मंगळुरु ते लोकमान्य टिळक मुंबई,  तसेच गाडी नंबर 01455  करमळी ते लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक ते मंगळुरु (01155) , ट्रेन क्रमांक 01156, ट्रेन क्रमांक 01459,  तर ट्रेन क्रमांक 01460 करमळी ते लोकमान्य टिळक अश्या या गाड्या चालवल्या जाणार आहेत.

कसे असेल वेळापत्रक? Indian Railways

ट्रेन क्रमांक 01453 टिळक ते मंगळुरु ही गाडी 22 डिसेंबर व 29 डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक मुंबई स्थानकावरून रात्री 10:15 वाजता मंगळुरुला रवाना होणार असून ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच संध्याकाळी 5:05 वाजता मंगळुरुला पोहचेल.

गाडी नंबर 01454 मंगळुरु ते लोकमान्य टिळक मुंबई ही स्पेशल गाडी मंगळुरुहुन 23 डिसेंबर आणि 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:45 वाजता निघून लोकमान्य टिळक मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी 2:55 वाजता पोहचेल.

गाडी नंबर 01455  करमळी ते लोकमान्य टिळक ही गाडी 24 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला लोकमान्य टिळक स्थानकावरून रात्री 10:15 वाजता धावणार असून ती दुसऱ्या दिवशी करमळी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 11:15 ला पोहचेल.

लोकमान्य टिळक स्थानक ते मंगळुरु (01155)  ही गाडी 25 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 ला करमळीहुन सकाळी 11:45 वाजता निघेल आणि लोकमान्य टिळक स्थानकावर त्याच दिवशी रात्री 11:45 वाजता पोहचेल. हा प्रवास बारा तासाचा असणार आहे.

ट्रेन क्रमांक 01156 हीं गाडी लोकमान्य टिळक ते मंगळुरु अश्या रूटणे धावणार असून 26 डिसेंबर व 2 जानेवारी 2024  रोजी लोकमान्य टिळक स्थानकावरून रात्री 10:15 वाजता सुटून दुसऱ्या दिवस्हो मंगळुरुला 5:5pm ला पोहचेल.

तर ट्रेन क्रमांक 01459 ही गा़डी 27 डिसेंबर व 3 जानेवारीला संध्याकाळी 6:45 वाजता निघून ती लोकमान्य टिळक स्थानकावर दुसऱ्या दिवशी 2:25 वाजता पोहचेल.  ट्रेन क्रमांक 01459 लोकमान्य टिळक ते करमळी – ही गाडी लोकमान्य टिळक स्थानक येथून 21आणि 28 डिसेंबर रोजी रात्री 10:15 वाजता निघेल आणि करमळी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 11:15 ला पोहचेल.

तसेच ट्रेन क्रमांक 01460 करमळी ते लोकमान्य टिळक चालवली जाणरी गाडी 22 आणि 29 डिसेंबरला  सकाळी 11:45 ला करमळीहुन निघेल आणि लोकमान्य टिळक स्थानकावर त्याच दिवशी रात्री 11:45 ला पोहचेल.  या विशेष गाड्यांमुळे नाताळ मध्ये प्रवाश्यांचा प्रवास हा सुखकर होणार असून त्याचा फायदा प्रवाश्यांना होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.