हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेचे जाळे प्रचंड पसरले आहे. त्यामध्ये लोकांना नेहमी चांगल्या सेवा दिल्या जातात. कमी खर्चात जास्त प्रवास करायचं म्हटले कि लोक रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. ऑक्टोबर म्हटले कि नवरात्रीचा उत्सव , या काळात अनेक भक्त मंदिरांना भेट देतात .तसेच नवरात्री मध्ये नऊ दिवस उपवास करतात. पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना प्रवाशांना अन्न आणि पेयाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचाच उपाय म्हणून भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष पाऊल उचलले आहे. नवरात्रीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अन्नाची अडचण होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने 150 हून अधिक स्टेशन नवरात्री स्पेशल थाळी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पौष्टिक आणि हलके अन्न मिळणार
या थाळीत प्रवाशांना साबुदाणा खिचडी, बटाट्याचे पदार्थ , फराळाचा लाडू आणि इतर पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लोकांना पौष्टिक आणि हलके अन्न मिळावे यासाठी तेल , लसूण , मसाला नसलेले पदार्थ दिले जाणार आहेत. याचे वैशिष्ट म्हणजे हि सेवा नऊ दिवस सुरु रहाणार आहे. यामुळे नवरात्रीच्या या विशेष योजनेचा लाभ घेऊन प्रवासी त्यांच्या प्रवासात आनंदाने घालवू शकतात.
प्रमुख स्टेशनचा समावेश
हि सेवा प्रवाशांना विशेष स्थानकावर देण्यात येणार आहे. त्यामध्ये मुंबई सेंट्रल, दिल्ली जंक्शन, सूरत, जयपूर, लखनौ, पाटणा जंक्शन,लुधियाना, दुर्ग, चेन्नई सेंट्रल, सिकंदराबाद,अमरावती, हैदराबाद, तिरुपती, जालंधर सिटी,उदयपूर सिटी, बंगळुरू कॅन्ट ,नवी दिल्ली ,ठाणे ,पुणे ,मंगलोर सेंट्रल स्टेशन अशा अनेक ठिकाणांचा समावेश असणार आहे.
ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑर्डरची सुविधा
भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑर्डर करण्याची सुविधा देखील दिली आहे . प्रवाशांना त्यांचा PNR नंबर IRCTC अॅपवर किंवा IRCTC ई-कॅटरिंग वेबसाइटवर टाकून सहजपणे थाळी बुक करता येईल. प्रवाशांना त्यांच्या आहारातील धार्मिक आणि सांस्कृतिक गरजांची काळजी घेत सेवा दिल्या जाणार आहेत. त्यांच्या आवडीनुसार आहार उपलब्ध होणार आहे.