Indian Railways : रेल्वेचं तिकीट हरवलय? अहो मग घाबरू नका! फक्त करा हे काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास करणारे अनेक लोक असतात. आरामदायी आणि कमी पैशात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वे प्रवासाला (Indian Railways) प्राधान्य देतात. मग कितीही गर्दी असली काहीजण रेल्वेनेच प्रवास करतात. मग त्यासाठी तिकिट बुकिंग करणे, कधीकधी भल्या मोठ्या रांगेत उभा थांबून तिकीट काढले जाते. आणि हे करत असताना जर तुमचे तिकीट हरवले तर. .. असं झालं तर आपली पूर्णपणे तारांबळ उडते. मात्र ह्यावरही रेल्वेने नवीन पर्याय उपलब्ध केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

100 रुपये भरून मिळवा डुप्लिकेट तिकीट

प्रवास करत असताना तिकीट हरवल्यास तुम्हाला 100 रुपये दंड भरून तिकीट नवीन मिळवता येते. तिकीट हरवल्यानंतर लगेच तिकीट तपासकाच्या कक्षेत जाऊन त्यास संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर तो तुम्हास डुप्लिकेट तिकीट बनवून देईल. आणि त्या तिकिटाच्या आधारावर तुम्ही तुमचा प्रवास सुखकर करू शकता. तसेच जर तुमचे तिकीट फाटले असेल तरीसुद्धा तुम्ही डुप्लिकेट तिकीट मिळवू शकतात.

रेल्वे ऍपवरून सुद्धा मिळवू शकता तिकिट- Indian Railways

रेल्वेचे IRCTC च्या आपवर तुम्ही नवीन तिकीट मिळवू शकता. ह्या ऍपवर TTE ह्या पर्यायावर क्लीक करून तेथे दिलेली माहिती भरून तुम्ही नवीन तिकीट मिळवू शकता. परंतु अनेकदा असं होत की रेल्वेचे तिकीट फुल झालेले असतात. त्यात जर आपल्याला एका ठिकाणी जाणे अत्यंत गरजेचे असेल तर आपल्याला वेटिंग लीस्ट मध्ये टाकून रेल्वेचे तिकीट (Indian Railways) दिले जाते. परंतु जर हेही तिकीट तुमच्याकडून हरवले असेल तर मात्र तुम्हाला डुप्लिकेट तिकीट प्राप्त होऊ शकत नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर समजा हरवलेले तिकिट सापडले तर…

हरवलेले तिकीट तुम्हाला परत सापडले आणि त्याआधी जर तुम्ही डुप्लिकेट तिकीट काढले असेल तर तुम्ही तिकीट तपासकाकडे जाऊन हरवलेले तिकीट दाखवून मोजलेले 100 रुपये परत मिळवू शकतात.