Indian Railways : रेल्वे प्रवाशांना खुषखबर!! ट्रेन उशिरा आल्यास तिकिटाचे पैसे परत मिळणार

Indian Railways Ticket Refund
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways भारतीय रेल्वे हि अत्याधुनिक सुविधा देत प्रवासांना रेल्वेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात वंदे भारत रेल्वे असेल,रेल्वे स्थानकाचे नुतीनीकरण करणे, यासारख्या प्रयत्नामुळे भारतीय रेल्वेकडे पाहण्याचा दुष्ठीकोन प्रवासांचा बदलत आहे. प्रवाशांसाठी रेल्वे विभागाकडून सतत नवनवीन नियम जारी केले जातात, जेणेकरून प्रवाशांना अतिशय चांगल्या प्रकारे रेल्वेचा प्रवास करता येईल. आताही रेल्वेने आणखी एक नियम काढून प्रवासांना आनंदाची बातमी दिली आहे. जर रेल्वेगाडी उशिरा आली, रेल्वेतील एसी बंद असेल आणि संबधित व्यक्तीन २४ तासाच्या आत तक्रार केल्यास तिकिटांचे पैसे परत मिळणार आहेत. प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

रेल्वे प्रशासनाचा नेमका आदेश काय ? Indian Railways

लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या उशिरा (Indian Railways) आल्यासं प्रवाशांची गैरसोय होते, ट्रेनच्या एसी डब्यातील एसी बंद असल्यास प्रवासांना त्रासाला सामोरे जावे लागत असे. म्हणून या सगळ्या गोष्टींवर तोडगा रेल्वे प्रशासनाने काढला आहे. जर रेल्वे गाडी उशिराने आली किंवा एसी बंद असेल तर संबधित प्रवासांना तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत. यात महत्त्वाचा नियम म्हणजे जर रेल्वे गाडी ३ तासांपेक्षा उशिरा आली असेल आणि एसी कोचमध्ये २ तासांपेक्षा जास्त एसी नसेल तर तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइटवर तक्रार करावी लागेल.

हा आदेश कोणाला लागू पडणार..

हा नियम ज्यांचे कन्फर्म तिकिट असेल त्यांच प्रवाशांना हा नियम लागू होणार नाही . जर सदर व्यक्तीचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि रद्द झाले असेल, तर हा नियम लागू होणार नाही. तसेच, जर नैसर्गिक आपत्तीमुळे रेल्वे उशिराने आली तरीही रिफंड मिळणार नाही. एसी बिघाड झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनच्या टीटीई किंवा कर्मचाऱ्यांकडून पुराव्यासाठी लेखी तक्रार करावी लागेल. (Indian Railways)

पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल..

सर्वात आधी रेल्वे विभागाच्या www.irctc.co.in वेबसाईटला भेट द्या.
वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डने लॉगिन करा.
त्यानंतर होमपेजवर “तक्रार नोंदणी ” पर्यायावर क्लिक करा .
तुमच्या तिकिटाचा PNR क्रमांक, प्रवासाची तारीख आणि तुमची समस्या टाका.
सर्व माहिती भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर तुमचे पैसे ७ ते १० दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यावर जमा होतील.