Indian Railways Ticket : रेल्वे तिकीटसाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; QR कोड आणि UPI पेमेंटने बुक करा तिकीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे गर्दीला सामोरे जावे लागते. भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास रेल्वे हीच डोळ्यासमोर येते. परंतु, लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे स्टेशनवर गेल्यावर तिकीट काढणे म्हणजे खूप मोठा टास्क असतो. एवढ्या प्रचंड गर्दीत आपला नंबर लावून तिकीट (Indian Railways Ticket) काढणे अनेकांना कठीण वाटते. परंतु आता तुम्हाला तिकिटासाठी गर्दीतून जागा काढत खिडकीत जाऊन तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. कारण आता QR कोडने तिकीट काढता येणार आहे. ते कसे ते पाहू.

मेट्रोप्रमाणे भारतीय रेल्वे तिकिटांचे QR कोडमध्ये रूपांतर करण्यात आले

ज्याप्रमाणे मेट्रोमध्ये तिकिटाचे रूपांतर QR कोडमध्ये करण्यात आले आहे. अकदी त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेकडून तिकिटाची सुविधा प्रवाश्यांना देण्यात आली आहे. मागील महिन्यात दक्षिण रेल्वेने QR कोड समर्थित तिकिटांची घोषणा केली होती. त्याचा अवलंब हा आता उत्तर रेल्वेने केला आहे. उत्तर रेल्वेने मुरादाबाद रेल्वे विभागात ही सेवा सुरु केली आहे. QR कोड आणि UPI पेमेंटद्वारे प्रवासी स्वतः ई-तिकीट खरेदी करू शकतील. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे.

कसे काढाल तिकीट? Indian Railways Ticket

रेल्वेने UTS ऍपद्वारे ही सुविधा दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारतीय रेल्वेचे UTS अँप डाउनलोड करावे लागणार आहे. UTS ऍप डाउनलोड केल्यानंतर येथे बुक तिकिट मेनूमध्ये QR बुकिंगचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लीक करून QR कोड असलेल्या रेल्वे स्टेशनवर जावे लागेल. त्यानंतर UTS ऍप वापरून स्कॅन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन निवडायचे आहे. आणि अतिरिक्त फील्ड निवडा. त्यानंतर ट्रेनचे तिकीट त्वरित जनरेट करण्यासाठी पेमेंट करायचे आहे. त्यासाठी तुम्ही UPI पेमेंटचा वापर करू शकता. तसेच तिकीट बुक केल्यानंतर QR कोडच्या URL सह नंबरवर एक SMS पाठविला जाईल. असे तिकीट बुक करता येणार आहे.

ATVM द्वारे प्रवाश्यांना सेवा देण्यासाठी IRCTC सोबत केली भागीदारी

रेल्वे स्थानकांवर स्थापीत असलेल्या ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे प्रवाशांना डिजिटल तिकीट सेवा (Indian Railways Ticket) देण्यासाठी इरसातच सोबत भागीदारी केली आहे. ATVM या सेवेद्वारे तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर असलेल्या ATVM वर सेवांसाठी पेमेंट पर्याय म्हणून Paytm निवडावे लागेल. त्यानंतर QR कोड स्कॅन करावा.  त्यानंतर तुमचे तिकीट लगेचच तयार केले जाईल किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज केले जाईल. त्यामुळे आता प्रवाश्यांना रांगेत उभा राहून तिकीट काढण्याची गरज भासणार नाही.

कोणत्या स्थानकावर उपलब्ध आहे ही सुविधा?

सध्या ही सुविधा शहाजहानपूर,बरेली,चांदौसी, हापूर, रुरकी, हरदोई, हरीद्वार, नजीबाबाद, रामपूर, डेहराडून, आमरोहा यासारख्या इतर ठीकणावरही ही सुविधा उपलब्ध आहे.