Indian Railways : भारतीय रेल्वे खरेदी करणार 1 लाख कोटींच्या नव्या गाड्या; आता प्रवाशांना Waiting करावं लागणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय  रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून देशात करोडो लोक रोज प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे देशभरात हजारो किलोमीटर रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. याच्या माध्यमातून अनेक प्रवासी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. परंतु भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना महिनाभर आधीपासून बुकिंग करावे लागते. अचानक ठरलेल्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणे अगदीच कठीण होऊन जाते. त्यामुळे बऱ्याच प्रवाश्यांना प्रतीक्षा यादीत स्थान मिळते. त्यामुळे प्रवाश्यांची मोठी अडचण होते. हीच अडचण लक्षात घेत भारतीय रेल्वेने यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन रेल्वे सेट खरेदी करण्याची रेल्वे विभागाची तयारी: Indian Railways

भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाश्यांसाठी नेहमी आरक्षित तिकीट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व प्रतीक्षा यादी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी तब्बल 3000- 5000 नवीन रेल्वे सेट खरेदी करण्याची तयारी रेल्वे विभागाने दाखवली आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या माध्यमातून 10754 रेल्वेगाड्या रोज चालवण्यात येतात. तरी देखील भारतीय रेल्वेची वाढती मागणी लक्षात घेत रेल्वे तिकिटासाठीची प्रतीक्षा यादी संपवण्यासाठी रेल्वे नवीन ट्रेन खरेदी करणार आहे. त्यासाठी तब्बल 1 लाख करोड रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. येत्या काळात हा खर्च भारतीय रेल्वे करेल व प्रवाश्यांना सर्वोतम सेवा प्रदान करेल असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे .

रेल्वेमध्ये 7000-8000 नवीन ट्रेन सेट दाखल होणार :

भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून नवीन रेल्वेगाड्यांसाठी आवश्यक असणारे टेंडर प्रक्रिया येत्या 4-5 वर्ष्यात टप्प्याटप्याने पुर्ण करण्यात येईल. ज्याद्वारे रेल्वेमध्ये 7000- 8000 नवीन ट्रेन सेट येत्या 15 वर्ष्याच्या कालावधी मध्ये प्रवाश्यांच्या सेवेत आणले जातील. जे की भारतीय रेल्वेचे रुपडे कायमस्वरूपी बदलतील.  याचबरोबर रेल्वे मंत्री वैष्णव यांनी अधोरेखित केले की, नवीन योजनेनुसार ट्रॅक टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरासरी 16 किलोमीटर प्रतिदिन प्रमाणे 5,500 ते 6,000 किलोमीटर नवीन ट्रॅक पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे प्रगतीपथावर कार्य करताना असेच अधोरेखित होतआहे.