Indian Railways : AI रोखणार रेल्वे अपघात; नवीन सिस्टीम कसं काम करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । आपल्या भारतात रेल्वेचं जाळं मोठं आहे . देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी जायचं असेल तर आपण रेल्वेने जातो. कमी खर्चात आणि आरामदायी प्रवास होत असल्याने रेल्वे प्रवासाला मोठी गर्दी बघायला मिळते. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र मागील काही वर्षात घडलेल्या विविध रेल्वे अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. यावर उपाय करण्यासाठी रेल्वे विभागाने आता AI ची मदत घेण्याचं ठरवलं आहे.

कसं काम करणार ? Indian Railways

रेल्वेची सेवा कार्यक्षमता सुधारण्यासाठी (Indian Railways) आणि रोलिंग स्टॉकची देखभाल ऑटोमॅटिक करण्यासाठी, भारतीय रेल्वे (IR) ने मशीन व्हिजन बेस्ड इन्स्पेक्शन सिस्टम (MVIS) बसवण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. एमव्हीआयएस हे रस्त्याच्या कडेला तैनात केलेले एक आधुनिक, एआय/एमएल-आधारित तंत्रज्ञान आहे. हि सिस्टीम धावत्या ट्रेनच्या अंडर-गियरचे HD फोटो काढते आणि कोणतेही लटकलेले, सैल किंवा गहाळ पार्ट ऑटोमॅटिक शोधते. जर काही दोष किंवा तांत्रिक बिघाड आढळला तर ही सिस्टीम रिअल-टाइम अलर्ट पाठवते. MVIS च्या अंमलबजावणीमुळे रेल्वे डब्यांची झीज आणि नुकसान यासाठी मशीन-आधारित तपासणी शक्य होईल. तसेच यामुळे मॅन्युअल तपासणीतील चुका दूर होतील.

रेल्वे बोर्डाचे संचालक सुमित कुमार आणि DFCCIL चे GGM जवाहर लाल यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे औपचारिकपणे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारांतर्गत, DFCCIL चार MVI युनिट्सची खरेदी, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसाठी जबाबदार असेल. भारतीय रेल्वे विभागात अशा प्रकारची AI सिस्टीम प्रथमच वापरली जाणार आहे. या नव्या AI तंत्रज्ञानामुळे रेल्वे सुरक्षितता वाढेल, आणि संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल अशी आशा आहे. हा उपक्रम रेल्वे इकोसिस्टममध्ये आधुनिक, इंटेलिजन्स सिस्टीम सादर करण्याच्या IR च्या व्यापक उद्दिष्टाशी देखील सुसंगत आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने भविष्यात तयार असलेल्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या उभारणीत रेल्वे सुरक्षेत डिजिटल परिवर्तनासाठी नवीन मार्ग उघडले जातील,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.