व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Indian Railways : लवकरच येणार ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ आणि ‘वंदे मेट्रो’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railways) मोठी आनंदाची बातमी आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन ही चालू आर्थिक वर्षात लॉंच केली जाणार आहे. Integral Coach Factory चे जनरल मॅनेजर बी. जि. मल्ल्या यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासादरम्यानही प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

सध्या भारतात 25 पेक्षा अधिक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चालवली जात आहेत. परंतु सध्या धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ह्या बैठक व्यवस्था असलेल्या व मर्यादित अंतरापर्यंत चालवल्या जातात. त्यामुळे स्लीपर कोचेस असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची मागणी होत होती. या मागणीचा विचार करत भारतीय रेल्वेने Integral coach factory च्या मदतीने वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर version तयार केले आहे. सध्या स्लीपर (Vande Bharat Sleeper Coach) रूपातील वंदे भारत एक्सप्रेसच्या कंपनी पातळीवर अनेक तपासण्या चालू आहेत त्या पुर्ण झाल्यानंतर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत रेल्वे रुळावर धावेल.

1000 KM पेक्षा अधिक अंतराचा प्रवास करण्यासाठी ही ट्रेन सक्षम

ICF चे जनरल मॅनेजर बी. जि. मल्ल्या यांनी सांगितल्यानुसार स्लीपर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ही एकूण 16 कोचेस असेल. ज्यामध्ये प्रामुख्याने 11 कोचेस 3AC ( economy ), 4 कोचेस हे 2AC असतील . तर 1 बोगी 1AC साठी असेल. अश्या प्रकारे स्लीपर एक्सप्रेस ची रचना असेल.1000 KM पेक्षा अधिक अंतराचा प्रवास करण्यासाठी ही ट्रेन (Indian Railways) सक्षम असेल.

RVNL आणि रशियाच्या TMH ग्रुपच्या संघाद्वारे तयार केल्या जात आहेत ह्या ट्रेन

या स्लीपर ट्रेन्स भारताच्या रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) आणि रशियाच्या TMH ग्रुपच्या एका संघाद्वारे तयार केल्या जात आहेत ज्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या 200 नवीन आवृत्तींपैकी 120 पुरवठा करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली आहे, तर उर्वरित 80 गाड्या टिटागड वॅगन्स आणि भेल यांचा समावेश असलेल्या संघाद्वारे तयार केल्या जातील.

कुठे चालवली जाईल ट्रेन? Indian Railways

दिल्ली – मुंबई, मुंबई – नागपूर, मुंबई – बंगलोर, हैद्राबाद -बंगलोर, मुंबई – हैद्राबाद या शहरा दरम्यान ही वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वप्रथम 15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली आणि वाराणसीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाला. चेन्नईतील ICF मध्ये निर्मित ही ट्रेन मेक-इन-इंडिया ट्रेन प्रवाशांना चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यात वडे भारत ट्रेन पोचली आहे.