भारतीय रेल्वे लाँच करणार 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन; प्रवास होणार आणखी सोप्पा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स ( Vande Bharat Sleeper Trains) लाँच करण्याची तयारी करत असून , यामुळे दीर्घ आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे. तसेच याचा मुख्य उद्देश भारतातील लांब पल्ल्याच्या प्रवासाचा अनुभव बदलणे आहे. वंदे भारत चेअर कार ट्रेनच्या यशानंतर आता स्लीपर ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्याचा रेल्वेचा हेतू आहे. त्यामुळे लांब आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

पहिल्या रेकचे प्रोटोटाइप –

BEML कंपनीने तयार केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या रेकचे प्रोटोटाइप सध्या लखनऊच्या संशोधन डिझाइन्स आणि मानक संघटना (RDSO) यांच्या देखरेखीखाली चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. या चाचण्या विविध भारद्वारे 130 किमी/तास ते 180 किमी/तास वेगाने होणार आहेत. 16 डब्यांच्या या रेकमध्ये Class I ते Class III च्या सुविधा असून प्रवाशांच्या सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी कडक चाचण्या घेतल्या जात आहेत.

200 स्लीपर ट्रेन तयार करण्याचे नियोजन –

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे की , सध्या 10 वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन सुरू असून एकूण 200 स्लीपर ट्रेन तयार करण्याचे नियोजन आहे. चाचण्यांचे निकाल आल्यावर वेळापत्रकानुसार उत्पादन प्रक्रियेला गती दिली जाईल. या स्लीपर ट्रेन प्रवाशांसाठी अधिक जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा निर्माण करतील.

LHB च्या उत्पादनात वाढ –

सध्या 136 वंदे भारत चेअर कार ट्रेन इलेक्ट्रिफाइड ब्रॉड गेज मार्गावर चालत आहेत आणि त्यांचा प्रवासी दर 100 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याशिवाय, भारतीय रेल्वेने Linke Hofmann Busch (LHB) कोचचे उत्पादनही वाढवले आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 36933 कोच तयार करण्यात आले आहेत. , जे कि मागील दशकाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीला अनुसरून रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या व्यावसायिक सेवेला येत्या काही वर्षांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होणार आहे. त्यामुळे प्रवासातील अडथळे कमी होणार आहेत.