Indian Railways : एकाच तिकिटावर करा 8 वेळा प्रवास; रेल्वेचा ही योजना माहितेय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून भारतात करोडो प्रवासी दररोज प्रवास करतात . भारतीय रेल्वेचे देशभरात हजारो किलोमीटर रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. याच्या माध्यमातून अनेक प्रवासी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात . परंतु प्रवासादरम्यान अनेकांना वेगवेगळ्या स्थानकात थांब्यानुसार तश्या स्वरूपात तिकिटे खरेदी करावी लागतात .यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त वेळ जातो. यावर उपाय करण्यासाठी रेल्वेने अनोखी तिकीट योजना आणली आहे. या माध्यमातून तुम्ही एकाच तिकिटावर 8 वेळा प्रवास करू शकता. ही तिकीट योजना नेमकी आहे तरी काय हे आज आपण जाणून घेऊया…..

रेल्वेची Circular Journey Ticket योजना : Indian Railways

Circular Journey Ticket च्या मदतीने रेल्वेचे प्रवासी एकाच तिकिटावर 8 वेगवेगळ्या स्थानकावर प्रवास करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तिकीट काढणाऱ्या अधिकाऱ्याला तुमच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग सांगावा लागणार आहे. त्यानुसार तुमचे “Circular tickit” निघणार आहे. हे तिकीट काढल्यानंतर पुढील 56 दिवसांपर्यंत वैध असणार आहे. त्यामुळे तुम्ही एकाच तिकिटाच्या आधारावर हजारो किलोमीटरचा रेल्वेचा प्रवास करू शकणार आहात. उदाहरणार्थ, तुम्ही उत्तर रेल्वेवरून (Indian Railways) नवी दिल्ली ते कन्याकुमारी प्रवासाचे तिकीट घेतलं तर तुमचा प्रवास नवी दिल्लीपासून सुरू होईल आणि परत नवी दिल्लीत संपेल. तुम्ही मथुरा मार्गे मुंबई सेंट्रल – मार्मागोवा – बंगलोर सिटी – म्हैसूर – बंगलोर सिटी – उधगमंडलम – तिरुवनंतपुरम सेंट्रल मार्गे कन्या कुमारी येथे पोहोचाल आणि त्याच मार्गाने नवी दिल्लीला परत याल. 7,550 किलोमीटरच्या या प्रवासासाठी बनवलेले circular तिकीट असणार आहे.

Circular tickit असे होईल बुक :

तुम्ही जिथून तुमचा प्रवास सुरू करणार आहात त्या स्टेशनच्या बुकिंग ऑफिसमध्ये फॉर्म सादर करून तुम्ही लांबपर्यंतच्या प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकता. प्रवासासाठी तिकिटे खरेदी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या ठिकाणासाठी जागा आरक्षित करण्यासाठी आरक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवासासाठीआरक्षित तिकिटे दिली जातील.