Indian Railways : आता रेल्वेतही मिळणार उपवासाचे पदार्थ; नवरात्रीच्या निमित्ताने निर्णय!! असे करा पदार्थ ऑर्डर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जात आहे. आपल्यापैकी अनेकजण नवरात्रीचे नऊ  दिवस देवींची आराधना करतात आणि नऊ दिवस नवरात्रीचे उपवास देखील करतात . नवरात्रीच्या काळात उपवास असताना देखील अनेकजण रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून प्रवास करतात.अशा प्रवाशांची नवरात्री काळात उत्तम सोय व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन भारतीय रेल्वेने आपल्या केटरिंग सुविधेत उपवासाचे पदार्थ उपलब्ध करुन दिले आहेत.

भारतीय रेल्वेने IRCTC माध्यमातून चालवण्यात  येणाऱ्या केटरिंग सुविधेत नवरात्रीच्या काळात उपावसाच्या पदार्थाचा समावेश करून या सेवेला ” व्रत का खाना  ” असे विशेष नामकरण देखील करण्यात आले आहे. IRCTC च्या मार्फत चालवली जाणारी ही सुविधा घटस्थापनेपासून (15 ऑक्टोबर ) सुरु करण्यात आली असून विजयादशमी (24 ऑक्टोबर) पर्यंत भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) प्रवाश्यांना देण्यात येणार आहे .

भारतीय  रेल्वेच्या “व्रत का खाना” (Vrat ka Khana) सुविधेअंतर्गत  साबुदाणा खिचडी, कुट्टू का आटा, सेंधा नमक सारखे उपवासाचे पदार्थ उपलब्ध असणार आहेत. व्रत की थाली देखील प्रवाश्यांना उपलब्ध  करून दिली जाणार आहे. मात्र उपवासाची थाली भारतीय  रेल्वेच्या मर्यादित स्थानकातच उपलब्ध असेल. ज्यामध्ये नवी दिल्ली, अंबाला कॅन्ट., झाशी, औरंगाबाद, कानपूर सेंट्रल, जबलपूर, रतलाम, जबलपूर, सुरत, कल्याण, बोरिवली, दुर्ग, जयपूर, पाटणा, राजेंद्र नगर, अकोला, इटारसी, वसई रोड, नाशिक रोड, ग्वाल्हेर, मथुरा, नागपूर, भोपाळ आणि अहमदनगर स्टेशन यांचा समावेश आहे.

कुठे आणि कशी कराल ऑर्डर – Indian Railways

या पदार्थची ऑर्डर तुम्हाला किमान 2 तास अगोदर देणे गरजेचे  असेल. तुम्हाला यासाठीची पेमेंटसाठी ऑनलाईन व pay on delivery चा पर्याय देखील  उपलब्ध असेल. तुम्ही हे सर्व पदार्थ IRCTC अँपच्या माध्यमातून तुमच्या PNR नंबरच्या आधारावर ऑर्डर करू  शकता. त्यासाठी तुम्हाला IRCTC चे  अँप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.