Indian Railways : रेल्वेमध्ये अंघोळीची सोय का नसते? कारण वाचून व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय आणि भारतीयांचे प्रवासाचे मुख्य स्रोत म्हणजे बस, विमान, मोटारसायकल, रेल्वे. त्यापैकी रेल्वे (Indian Railways) हे सर्वाधिक वापरले जाणारे वाहन आहे. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी आणि स्वस्तात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेच्या प्रवासाला पसंती दर्शवतात. साहजिकच रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. त्याचबरोबर विद्यार्थी देखील ह्याचा महत्वाचा भाग आहे. ट्रेनमध्ये झोपन्यापासू ते वॉशरूम पर्यंत सर्व  गोष्टींची उपलब्धता असते. मात्र तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, ट्रेन मध्ये ज्याप्रमाणे टॉयलेट असते त्याप्रमाणे बाथरूम (अंघोळीची सुविधा ) का नसते? त्याचबद्दल आपण जाणून घेऊ.

का नसते ट्रेनमध्ये अंघोळीची सुविधा ? Indian Railways

याच मूळ कारण म्हणजे एका ट्रेनमध्ये एका डब्यात एकूण 4 छोट्या टाक्या लावलेल्या असतात. ज्यामध्ये एकावेळेस 450 ते 685 लीटर पाणी भरलं जात. आणि यातच जर अंघोळीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास पाण्याची कमतरता भासेल. त्यामुळे ट्रेनमध्ये अंघोळीची सुविधा नसते. ट्रेनमध्ये जर अंघोळीची सुविधा उपलब्ध करून दिली तर, सहाजिकच पाण्याची नासाडी होईल. कारण एका ट्रेनमध्ये हजारो व्यक्ती प्रवास करत असतात. त्या प्रत्येकाला अंघोळीसाठी लागणारे पाणी हे साहजिकच अधिक लागेल. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे पाण्याची बचत होते.

रेल्वेकडे सध्या 74,003 प्रवासी डबे

रेल्वेने (Indian Railways) दररोज करोडो लॉक प्रवास करतात. त्यांच्यासाठी विविध सोयी सुविधा निर्माण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामध्ये भारतीय रेल्वेकडून दररोज 8,702 पॅसेंजर ट्रेन आणि 13,523 ट्रेन चालवल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय रेल्वेकडे सध्य स्थितीला एकूण 12,147 लोकोमोटिव्ह असून 74,003 प्रवासी डबे आहेत. तसेच 289,185 वॅगन्स आहेत.