Indian Railways : या 5 ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला मिळतो सर्वात जास्त फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे  मोठे  रेल्वेचे  जाळे असलेला आपला भारत देश आहे. 65000 Rkm पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे जाळे असलेल्या भारतात 13000 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे चालवल्या जातात. मात्र देशभरात चालवल्या जाणाऱ्या हजारो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्या फक्त पाच प्रवासी रेल्वेगाड्यातून सर्वाधिक नफा मिळतो. त्या पाच रेल्वेगाड्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया .

Bangalore Rajdhani Express
Bangalore Rajdhani Express

1) बेंगलुरू राजधानी  एक्सप्रेस  ( 22692 ) :

बेंगलुरू राजधानी एक्सप्रेस ही दिल्ली येथील हजरत निजामउद्दीन स्थानाकपासून बेंगलुरू स्थानाकपर्यंत चालवली जाते. बेंगलुरू राजधानी एक्सप्रेसच्या प्रवासी वाहतुकीतून रेल्वे विभागाला (Indian Railways)  सर्वाधिक  नफा  मिळतो. उत्तर रेल्वे विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार बेंगलुरू राजधानी एक्सप्रेसच्या माध्यमातून रेल्वेने प्रवासी भाड्यातून 2022-23 या वर्षात तब्बल 176 कोटी रुपये कमावले आहेत.

Mumbai Central Rajdhani Express
Mumbai Central Rajdhani Express

2) मुंबई सेंट्रल राजधानी एक्सप्रेस : (Indian Railways)

देशाची राजधानी नवी दिल्ली ते देशाची आर्थिक राजधानी मुंबई सेंट्रल दरम्यान चालवल्या जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसद्वारे रेल्वेने 2022-23 या वर्षात 123 कोटी रुपये इतका नफा मिळवला आहे. संपूर्ण वर्षात राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्याची संख्या 4 लाख 85 हजार 794 इतकी होती.

Sealdah Rajdhani Express
Sealdah Rajdhani Express

3) सियालदह राजधानी एक्सप्रेस ( 12314 ) :

नवी दिल्ली ते पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोलकत्ता येथील सियालदह इथपर्यंत चालणारी राजधानी एक्सप्रेस रेल्वेला सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या प्रवासी रेल्वेच्या यादीत पहिल्या पाचात आहे. या ट्रेनच्या माध्यमातून रेल्वेने 2022-23 या वर्षात  5 लाखापेक्षा अधिक  प्रवाश्यांना आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोचवून तब्बल 128 कोटी रुपयांचा नफा  मिळवला आहे.

Dibrugarh Rajdhani Express
Dibrugarh Rajdhani Express

4) दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस (20504) :

सदर एक्सप्रेस नवी दिल्ली ते दिब्रुगढ या दोन शहरादरम्यान धावते. त्यामुळे रेल्वेला एकूण 126 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वर्ष  2022-23 या कालावधीत या ट्रेनमधून 4,85,794 प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेला नफा मिळवून देण्यात ह्या ट्रेनचा मोठा वाटा आहे.

Dibrugarh Rajdhani Express 1
Dibrugarh Rajdhani Express 1

5) दिब्रूगढ राजधानी एक्सप्रेस (12424 ) :

ही रेल्वेगाडी देखील दिब्रुगढ ते नवी दिल्ली अशी धावते. या ट्रेनच्या माध्यमातून देखील रेल्वेला मोठा  नफा  मिळतो. 2022-23 आर्थिक वर्षात  रेल्वेने या ट्रेनद्वारे 117 कोटी रुपयांची भरभक्कम कमाई केली आहे.