गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी घेतला क्रिकेटचा आनंद; Photos व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा खेळ भारतीयांचा अगदी जीव की प्राण आहे . देशातील जनता क्रिकेटवर प्रेम करणारी आहे. भारतात क्रिकेट एखाद्या धर्मासारखं मानलं जात. क्रिकेट खेळण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. भारत- चीन बॉर्डर वरील गलवान खोऱ्यातील (Galwan Valley) जवानांना सुद्धा हा मोह आवरला नाही. भारतीय लष्कराचे जवानांचे गलवान खोऱ्याजवळ क्रिकेट खेळतानाचे फोटो समोर आले आहेत.

Indian soldiers enjoy cricket in Galwan Valley

2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जिथे चिनी सैन्यासोबत रक्तरंजित चकमक झाली होती, तिथे भारतीय लष्कराचे जवानांनी क्रिकेटचा आनंद घेतला. लष्कराने गलवान खोऱ्याजवळील घोडे आणि खेचरांवरही सर्वेक्षण केले. याशिवाय पॅंगोंग तलावावर हाफ मॅरेथॉनसारखे उपक्रमही आयोजित करण्यात आले होते.

Indian soldiers enjoy cricket in Galwan Valley

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटो मध्ये भारतीय जवान गलवानच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये आणि खडकाळ खोऱ्यात क्रिकेट खेळताना दिसत आहेत. यासाठी जवानांनी क्रिकेटला लागणारी खेळपट्टी आणि विकेटचीही व्यवस्था केली आहे. या फोटो मध्ये जवान फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. भारतीय लष्कराचे सैनिक गॅल्वन व्हॅलीजवळ शून्य तापमानात जोरदार क्रिकेट खेळले. या खेळांच्या मदतीने सैनिकांना तंदुरुस्त आणि चपळ ठेवण्याचा लष्कराचा इरादा आहे.

Indian soldiers cricket Galwan Valley

लेह येथून कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 14 कॉर्प्सने याबाबत ट्विट करत म्हंटल कि, पटियाला ब्रिगेड, त्रिशूल डिव्हिजनने शून्यापेक्षाही कमी तापमानात आणि अतिशय उंच अशा प्रदेशात पूर्ण जोमाने आणि उत्साहाने एक क्रिकेट सामना आयोजित केला. आम्ही अशक्य ते शक्य करतो.

Indian soldiers cricket Galwan Valley

मे 2020 पासून पूर्व लडाख हे चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचे केंद्र बनले आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये लष्करी तणावही निर्माण झाला आहे. 2020 मध्ये चिनी सैन्याने भारताच्या सैनिकांवर विश्वासघात करून हल्ला केला होता. या हल्ल्यात देशाच्या 20 जवानांनी बलिदान दिले होते.