भारताची फिरकीपटू अडकली पुराच्या पाण्यात; NDRF ने केली सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वडोदरामध्येही, अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालं आहे. विश्वामित्री नदीचे पाणी शहराच्या खालच्या भागात भरले आहे. कडा तोडून पाणी निवासी भागात पोहोचले आहे. गुजरातच्या या पूरस्थितीत भारताची स्टार फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) अडकली. मात्र NDRF पथकाने तिची सुखरूप सुटका केली. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

राधाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक स्टोरी शेअर केली. त्यात तिने म्हंटल, आम्ही खूप वाईट परिस्थितीत अडकलो आहोत. आम्हाला वाचवण्यासाठी #एनडीआरएफचे खूप खूप आभार. राधा यादवपूर्वी इरफान पठाण वडोदरा येथील लोकांना घरात राहण्याचे आवाहन केलं आहे. पूरस्थिती असलेल्या नागरिकांनी आपल्या घरात सुरक्षित रहा असं इरफान पठाणने म्हंटल होते.

दरम्यान, बुधवारी, देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर या सौराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये 12 तासांच्या कालावधीत 50 मिमी ते 200 मिमी पाऊस पडला. द्वारका जिल्ह्यातील भानवड तालुक्यात सर्वाधिक 185 मिमी पाऊस झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सौराष्ट्रातील जिल्ह्यांच्या निर्जन भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वडोदरा शहरातील घरांमध्ये आणि छतावर अडकलेल्या लोकांची नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) चाय माध्यमातून सुटका करण्यात आली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या तीन दिवसांत मुसळधार पावसामुळे 26 जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. राजकोट, आनंद, महिसागर, खेडा, अहमदाबाद, मोरबी, जुनागढ आणि भरूच या जिल्ह्यांतील अनेकांचा मृत्यू झाला आहे.