WTC फायनलसाठी भारतीय संघ जाहीर; रहाणे IN, सूर्या OUT, पहा खेळाडूंची संपूर्ण List

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BCCI ने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलसाठी टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर केला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या या संघात भरवशाचा फलंदाज आणि सध्या आयपीएल मध्ये सुपर फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे तर सूर्यकुमार यादवला वगळण्यात आलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा सामना पाहायला मिळणार आहे. हा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी आज भारतीय संघाचा 15 जणांचा चमू जाहीर करण्यात आला आहे. 15 जणांच्या या चमूमध्ये 7 बॅट्समन, 3 अष्टपैलू आणि 5 जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असून विकेटकिपर धुरा केएस भरत सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच WTC 2023 च्या फायनलचा संघ जाहीर केला आहे.

पहा भारतीय संघाची संपूर्ण लिस्ट –

रोहित शर्मा, शुबमन गील, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत, रवी अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट