आशिया चषकासाठी महिला क्रिकेटची टीम जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात महिला आशिया चषकाला (Asia Cup) सुरुवात होणार आहे. हा चषक बांग्लादेश (Bangladesh) मध्ये खेळवण्यात येणार आहे. या चषकासाठी (Asia Cup) महिला क्रिकेट टीमची निवड करण्यात आली आहे. या चषकासाठी निवडलेल्या संघात अनुभवी महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये (Asia Cup) इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, थायलंड आणि युएई संघाचा समावेश आहे. या चषकासाठी श्रीलंका, युएई, थायलंड या महिला टीमने अद्याप आपले खेळाडू जाहीर केले नाहीत तर बाकी टीमने आपले खेळाडू जाहीर केले आहेत.

आशिया चषकासाठी (Asia Cup) महिला क्रिकेट टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबबिनिनी मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नेव्हीग्रे

आशिया चषकाचे (Asia Cup) वेळापत्रक
पहिला सामना- भारत विरुद्ध श्रीलंका, 1 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता

दुसरा सामना – भारत विरुद्ध मलेशिया, 3 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता

तिसरा सामना – भारत विरुद्ध UAE, 4 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता

चौथा सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान, 7 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता

पाचवा सामना- भारत विरुद्ध बांगलादेश, 8 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता

सहावा सामना- भारत विरुद्ध थायलंड, 10 ऑक्टोबर, दुपारी 1:00 वाजता

आशिया स्पर्धेतील अंतिम सामना 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर