आशियाई स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल; महिला क्रिकेट संघाची सुवर्ण कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज सुवर्णपदावर मोहर उमटवली आहे. आशियामध्‍ये झालेल्या क्रीडा स्पर्धेत भारतीने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव केला आहे. ज्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रथमच क्रीडा स्‍पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले गेले आहे. हा विजय मिळवून भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीमुळे आज त्यांचे संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे.

आशियाई क्रीडा स्‍पर्धेमध्ये भारताने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशाचा 8 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने गतविजेत्या पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. त्यानंतर भारताने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव केला आहे. सुरुवातीला भारतीय संघाची कामगिरी खराब झाली होती. पहिल्याच झटक्यात शेफाली वर्मा ही 15 चेंडूत 9 धावा करून बाद झाली होती. त्यानंतर स्मृतीने जेमिमासोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रणवीराने तोडली. तिने मंधानाला बाद केले. पुढे जाऊन भारताने 20 षटकांत सात गडी गमावून 116 धावा केल्या.

त्याचबरोबर, गोलंदाज तितास साधूने श्रीलंकेसोबतच्या तिसर्‍या षटकात दोन बळी घेतले. श्रीलंकेला पहिला धक्का 13 धावांचा बसला होता. पुढे जाऊन दीप्‍ती शर्माने 5 धावांवर कविशा दिलहरीला बाद केले. यानंतर 92 धावांवर श्रीलंकेने आपली सातवी विकेट गमावली. अखेरच्या क्षणाला राजेश्‍वरी गायकवाडच्‍या गोलंदाजीवर ऋचा घोषने सुगंधिका कुमारीला त्रिफळाचीत करत भारताला विजयी केले. भारतीय महिलांनी आजच्या सामन्यात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्‍पर्धेत पहिल्यांदा सुवर्णपदकावर मोहर उमटवली आहे.

भारतीय महिला संघ

आजच्या सामन्यात “हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, तीतस साधू आणि राजेश्वरी गायकवाड” या  खेळाडूंनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.